Sushant Singh Rajput | अभिनेत्री अंकिता लोखंडे सुशांतच्या वडिलांच्या भेटीला, पोलिसांकडून जुजबी चौकशी

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत काही वर्षांपूर्वी रिलेशनशीपमध्ये होते. मात्र त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता (Sushant Singh Rajput Ex Girlfriend Ankita Lokhande consoles his father)

Sushant Singh Rajput | अभिनेत्री अंकिता लोखंडे सुशांतच्या वडिलांच्या भेटीला, पोलिसांकडून जुजबी चौकशी
Follow us
| Updated on: Jun 16, 2020 | 3:32 PM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची एक्स गर्लफ्रेण्ड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे सुशांतच्या वडिलांना भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. यावेळी पोलिसांनी तिच्याकडेही जुजबी चौकशी केल्याची माहिती आहे. (Sushant Singh Rajput Ex Girlfriend Ankita Lokhande consoles his father)

सुशांतच्या अंत्यसंस्कारासाठी त्याचे वडील बिहारहून मुंबईत आले आहेत. ते सध्या वांद्र्यात तो भाड्याने राहत असलेल्या घरात थांबले आहेत. त्यामुळे वडिलांचे सांत्वन करण्यासाठी अंकिता सकाळी नऊ वाजता तिथे आली होती.

अंकिता गेली त्यावेळी पोलीसही तिथे होते. पोलिसांनी तिच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तिला सुशांतविषयी काही माहिती होती का, याबाबत त्यांनी विचारणा केली. अंकिताने नेमके काय सांगितले, हे अद्याप समजू शकलेले नाही.

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत तब्बल सहा वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. मात्र 2016 मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

अंकिताला सुशांतच्या आत्महत्येची बातमी फोनद्वारे मिळाली, त्या क्षणी ती जोरात ‘काय’ म्हणून ओरडली आणि दुसऱ्या क्षणाला तिने फोन ठेवला. गेल्याच आठवड्यात अंकिताने विकी जैनसोबत साखरपुडा केल्याचे बोलले जाते.

हेही वाचा : इकडे सुशांतवर अंत्यसंस्कार, तिकडे वहिनीनेही प्राण सोडले, राजपूत कुटुंबावर पुन्हा आघात

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या अकस्मात निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच आणखी एक आघात झाला आहे. सुशांतच्या चुलत वहिनी सुधादेवी यांचेही निधन झाले. सुशांतच्या निधनाचा मोठा धक्का बसल्याने सुधादेवी यांचे देहावसान झाल्याचे बोलले जाते.

सुशांतच्या पार्थिवावर काल (15 जून) मुंबईतील विले पार्लेत पवन हंस स्मशानभूमीत संध्याकाळी पावणेपाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल वातावरणात वडिलांकडून त्याच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. यावेळी त्याची बहीण, तिचा पती, मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि काही जवळचे नातेवाईक, मित्र उपस्थित होते. कूपर रुग्णालयापासून सुरु झालेल्या त्याच्या अखेरच्या प्रवासात वरुणराजानेही हजेरी लावली होती. अभिनेत्री श्रद्धा कपूर, क्रिती सॅनन, अभिनेते विवेक ओबेरॉय, रणवीर शौरी यासारखे मोजके कलाकार वगळता मोठ्या सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली नाही.

हेही वाचा : सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर अंकिता लोखंडेला धक्का, दुसऱ्या क्षणी फोन ठेवला

सुशांतने रविवार 14 जून रोजी वांद्र्यातील राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळफास बसून श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे. जेजे रुग्णालयात उत्तरीय तपासणीत त्याच्या शरीरात ड्रग्ज किंवा विष नसल्याचे स्पष्ट झाले. (Sushant Singh Rajput Ex Girlfriend Ankita Lokhande consoles his father)

सुशांतची कोणतीही सुसाईड नोट न सापडल्याने त्याच्या आत्महत्येच्या नेमक्या कारणांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, परंतु नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या 

Sushant Singh Rajput suicide l बॉलिवूडमधील दुश्मनीची बाजूही तपासणार, गृहमंत्र्यांचा थेट इशारा

Sushant Singh Rajput Suicide | सुशांतसोबत माजी मॅनेजरच्या आत्महत्येचाही नव्याने तपास, मैत्रीण रियाचाही जबाब घेणार

(Sushant Singh Rajput Ex Girlfriend Ankita Lokhande consoles his father)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.