Sara Ali Khan | ‘Coolie No. 1’च्या ट्रेलरवर डिसलाईक्सच्या वर्षावाची तयारी, सुशांतच्या चाहत्यांचा सारा अली खानवर राग!

ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच सुशांतच्या चाहत्यांनी ‘डिसलाईक’ करण्यासाठीची मोहीम सुरू केली आहे. चित्रपटासह सारा अली खानवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

Sara Ali Khan | ‘Coolie No. 1’च्या ट्रेलरवर डिसलाईक्सच्या वर्षावाची तयारी, सुशांतच्या चाहत्यांचा सारा अली खानवर राग!
Follow us
| Updated on: Nov 27, 2020 | 11:45 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan) यांचा आगामी चित्रपट ‘Coolie No. 1’ हा चित्रपट येत्या 25 डिसेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या (28 नोव्हेंबर) प्रदर्शित होणार आहे. मात्र, आता सुशांतच्या चाहत्यांनी सारावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच सुशांतच्या चाहत्यांनी ‘डिसलाईक’ करण्यासाठीची मोहीम सुरू केली आहे. चित्रपटासह सारा अली खानवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे (Sushant’s Fans angry on Sara Ali khan demanding boycott Coolie No 1).

सारा अली खानला ट्रोल करणारे अनेक मीम सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साराच्या या नव्या चित्रपटाला ‘बॉयकॉट’ करण्याची मागणी केली जात आहे. एकंदरीत सुशांतच्या बहुतांश चाहत्यांनी साराला बोल लावण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्याचा परिणाम आता या चित्रपटावर होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

(Sushant’s Fans angry on Sara Ali khan demanding boycott Coolie No 1)

डिसलाईक्सचा वर्षाव होणारच!

बरेच ट्विटर वापरकर्ते या चित्रपटाचा ट्रेलरला डिसलाईक करण्याविषयी चर्चा करत आहेत. तर, दुसरीकडे अनेक लोक या चित्रपटाची खिल्ली उडवत आहेत. सर्व वापरकर्त्यांनी ‘CVoolie No. 1) ट्रेलरला नापसंती दर्शवण्याची तयारी केली आहे. ‘साराच्या विरोधात अद्याप ड्रग प्रकरणी केस चालू आहे, तर चित्रपट कसा येऊ शकतो?’, असा प्रश्न काही वापरकर्त्यांनी विचारला आहे. तर, साराने सुशांतचा विश्वासघात केल्याचे काही वापरकर्ते म्हणत आहेत. केवळ ‘Coolie No. 1’ नाही तर, आलिया भट्टचा आगामी चित्रपट ‘सडक 2’ला देखील चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे (Sushant’s Fans angry on Sara Ali khan demanding boycott Coolie No 1).

(Sushant’s Fans angry on Sara Ali khan demanding boycott Coolie No 1)

कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे डिजिटल प्रदर्शन

डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘Coolie No 1’ हा चित्रपट 25 डिसेंबरला अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून साला अली खान आणि वरुण धवन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट 1 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तेव्हापासून देशभरातील चित्रपटगृह बंद होती.

चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी अनेक महिने वाट पाहिली, परंतु कोरोनाची परिस्थिती अद्याप सुधारलेली नाही. त्यामुळे अखेर निर्मात्यांनी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

(Sushant’s Fans angry on Sara Ali khan demanding boycott Coolie No 1)

या चित्रपटात वरुण आणि सारासह परेश रावल, जावेद जाफरी, राजपाल यादव, जॉनी लिव्हर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘कुली नंबर 1’ हा चित्रपट डेव्हिड धवन यांच्याच 1995 साली प्रदर्शित झालेल्या ‘कुली नंबर वन’ चित्रपटाचा रिमेक आहे. जुन्या चित्रपटात अभिनेता गोविंदा, अभिनेत्री करिष्मा कपूर, कंचन, कादर खान, शक्ती कपूर आणि हरीश कुमारसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

(Sushant’s Fans angry on Sara Ali khan demanding boycott Coolie No 1)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.