कार्यकर्तापद कुणीही हिसकवू शकत नाही, बिहारच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचं सूचक ट्विट
उपमुख्यमंत्रिपद निवडीबाबत भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी सूचक ट्विट केलं आहे (Sushil Kumar Modi on Deputy CM of Bihar).
पाटणा : बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या नेत्यांचे बैठकीचे सत्र सुरु आहे. एनडीएच्या नवनिर्वाचित आमदारांची आज (15 नोव्हेंबर) भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थित महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नितीश कुमार यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आलं. मात्र, उपमुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अजूनही एनडीएकडून माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत भाजप नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी सूचक ट्विट केलं आहे (Sushil Kumar Modi on Deputy CM of Bihar).
सुशीलकुमार मोदी हे उपमुख्यमंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार मानले जातात. मात्र, भाजप आमदारांच्या बैठकीत भाजप नेते तारकिशोर प्रसाद यांची भाजप विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर भाजप नेत्या रेणू देवी यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सुशीलकुमार मोदी यांना पुन्हा उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता कमी आहे. याशिवाय बिहारमध्ये दोन उपमुख्यमंत्री होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
तारकिशोरजी को भाजपा विधानमंडल का नेता सर्वसम्मति से चुने जाने पर कोटिशः बधाई !
— Sushil Kumar Modi (@SushilModi) November 15, 2020
तारकिशोर प्रसाद कटिहार विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. तर रेणू देवी या बेतिया विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आल्या आहेत (Sushil Kumar Modi on Deputy CM of Bihar).
नोनिया समाज से आने वाली बेतिया से चौथी बार विधायक श्रीमति रेणु देवी के भाजपा विधान मण्डल दल के उप नेता सर्वसम्मति से चुने जाने पर हार्दिक बधाई!
— Sushil Kumar Modi (@SushilModi) November 15, 2020
दरम्यान, सुशीलकुमार मोदी यांनी याबाबत सूचक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी तारकिशोर आणि रेणू देवी यांना विधिमंडळ नेता आणि उपनेतापदी निवड करण्यात आल्यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर कार्यकर्ता पद कुणीही हिसकवू शकत नाही, असंदेखील सुशीलकुमार ट्विटरवर म्हणाले आहेत.
“भाजप आणि संघ परिवाराने माझ्या 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मला भरपूर दिलं. यापुढे मला जी जबाबदारी दिली जाईल ती पार पाडेल. कार्यकर्ता पद कुणीही हिसकावू शकत नाही”, असं सुशीलकुमार मोदी म्हणाले.
भाजपा एवं संघ परिवार ने मुझे ४० वर्षों के राजनीतिक जीवन में इतना दिया की शायद किसी दूसरे को नहीं मिला होगा।आगे भी जो ज़िम्मेवारी मिलेगी उसका निर्वहन करूँगा।कार्यकर्ता का पद तो कोई छीन नहीं सकता।
— Sushil Kumar Modi (@SushilModi) November 15, 2020
दरम्यान, नितीशकुमार यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. नितीश कुमार सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. उद्या (सोमवार 16 नोव्हेंबर) दुपारी 11:30 ते 3 वाजण्याच्या दरम्यान शपथविधी होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
जनादेश नितीश कुमारांविरोधात, फक्त 40 जागा जिंकून मुख्यमंत्रिपद कसे? राजदचा सवाल