T20 WC, IND vs PAK : Zomato आणि Careem ट्विटरवर भिडले

सोशल मीडियाच्या या लढाईत दोन्ही बाजूंचे क्रिकेट जोरदार टोलेबाजी करत असतानाच भारत आणि पाकिस्तानातील दोन्ही खाद्य वितरण अॅप्स (food delivery apps) ही एकमेकांशी भिडले आहेत. रविवारी भारताच्या झोमॅटो (Zomato) आणि पाकिस्तानच्या करीम (Careem) मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर (Twitter) युद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. 

T20 WC, IND vs PAK : Zomato आणि Careem ट्विटरवर भिडले
Ind vs pak
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 8:04 PM

मुंबईः दीर्घ कालावधीनंतर भारत आणि पाकिस्तानचा महामुकाबला दुबईत रंगणार आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज (24 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये वातावरणनिर्मिती सुरु आहे आणि दोन्ही राष्ट्रांच्या क्रिकेट प्रेमींनी कोणता संघ जिंकेल यावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाद सुरू केला आहे. सोशल मीडियाच्या या लढाईत दोन्ही बाजूंचे क्रिकेट जोरदार टोलेबाजी करत असतानाच भारत आणि पाकिस्तानातील दोन्ही खाद्य वितरण अॅप्स (food delivery apps) ही एकमेकांशी भिडले आहेत. रविवारी भारताच्या झोमॅटो (Zomato) आणि पाकिस्तानच्या करीम (Careem) मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर (Twitter) युद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले.  (t20-world-cup-2021-india-vs-pakistan-both-team-fans-fight-on-social-media-zomato-careem-join)

या ट्विटर वॉरची सुरूवात आधी करीमने केली. “मुफ्त खाने का मौका भी और जीतने का मौका भी (मोफत खाण्याची संधी आणि जिंकण्याचीही संधी). पाकिस्तान विरुद्ध भारत सामन्याच्या दिवशी रात्री 9 वाजेपर्यंत जेवण ऑर्डर करा आणि जर पाकिस्तान जिंकला तर आम्ही तुमच्या ऑर्डरची रक्कम परत करू,” असं ट्विट करीमने केलं.

यानंतर झोमॅटोने देखील ट्विटवर जशास तसे प्रत्युत्तर दिलं. ‘प्रिय @TheRealPCB, जर तुम्ही आज रात्री बर्गर किंवा पिझ्झा शोधत असाल तर आम्हाला फक्त DM करा, असा टोला झोमॅटोने मारला.

2019 च्या विश्वचषकात भारताने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंबाबतची निराशा व्यक्त करतानाचा एका पाकिस्तानी फॅनचा व्हिडीओ खूप वायरल झाला होता. ज्यात तो पाकिस्तान क्रिकेट संघाच्या फिटनेस आणि आहाराच्या निष्काळजीपणाबद्दल बोलतो. त्या व्हिडीमध्ये तो फॅन बोलतो,”मला कळले की सामन्याच्या एक दिवस आधी पाकिस्तानच्या खेळाडूंनी बर्गर आणि पिझ्झा खाल्ले.”

करीमनेही संधी सोडली नाही आणि झोमॅटोच्या ट्विटला उत्तर दिले. “काळजी करू नका. आम्ही उद्या त्यांना मोफत बर्गर आणि पिझ्झा देत आहोत. आणि तुमच्यासाठी ” फॅन्टास्टिक चहा ?, असा चिमटा करीमने काढला.

दरम्यान, क्रिकेटप्रेमींमध्येही वाद सुरू आहेत. एका वादात, टीव्ही फोडण्यावरुन भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानी फॅन्सना डिवचलं. सुधीर गौतम म्हणाला की, चाचा यावेळीदेखील पाकिस्तानात टीव्ही फोडले जातील. यावर बशीर चाचा म्हणाले की, पाकिस्तान प्रत्येक वेळी टीव्ही का फोडेल? यावेळी टीव्ही भारतात फोडले जातील. भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये एकत्र दिसणाऱ्या क्रिकेटच्या या दोन सुपर फॅन्समध्ये अशीच गंमतीदार भांडणे पाहायला मिळाली.

मैदानात भारताचं पाकिस्तानवर वर्चस्व आहे. दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध 8 टी-20 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी पाच टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळले गेले आहेत. 8 T20 पैकी भारताने 7 वेळा पाकिस्तानचा पराभव केला आहे.

इतर बातम्या

India vs Pakistan T20 world cup 2021 LIVE Score: भारताची खराब सुरुवात, रोहित शर्मा पहिल्याच षटकात तंबूत परत

IND vs PAK: पाकिस्तानच्या खेळाडूला चेंडू दिसत नाही, तो संघात खेळवण्याच्या लायकीचा नाही; न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूची टीका

T20 World Cup 2021 : India vs Pakistan, both team Fans fight on social media Zomato Careem join

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.