T20 WC IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये केलेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ न देणे गरजेचं, अन्यथा विजय अवघड

Ind Vs Pak : भारत आणि पाकिस्तानचे संघ रविवारी T20 विश्वचषकात आमनेसामने येतील. प्रत्येक वेळी भारत आणि पाकिस्तानच्या वर्ल्डकप सामन्यांमध्ये मोठा थरार पाहायला मिळतो.

T20 WC IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये केलेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ न देणे गरजेचं, अन्यथा विजय अवघड
Ind Vs Pak
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 6:54 PM

Ind Vs Pak : भारत आणि पाकिस्तानचे संघ रविवारी T20 विश्वचषकात आमनेसामने येतील. प्रत्येक वेळी भारत आणि पाकिस्तानच्या वर्ल्डकप सामन्यांमध्ये मोठा थरार पाहायला मिळतो. या स्पर्धेत पाकिस्तान भारताला पराभूत करू शकेल का? असा सवाल पाकिस्तानी चाहत्यांना पडला आहे. प्रत्येक वेळी पाकिस्तान याबाबतीत अपयशी ठरत आहे. (T20 world cup : Mistakes made in 2017 Champions Trophy final must not be repeated, otherwise Pakistan can beat India)

पण यावेळी विश्वचषकातील टी-20 सामना अटीतटीचा होईल, असं म्हटलं जात आहे. कारण दोन्ही संघ मजबूत आहेत. दोन्ही संघांचे अनेक खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. पाकिस्तानी संघातील अनेक फलंदाज सध्या खोऱ्याने धावा काढत आहेत. पाकिस्तान संघाचं असं चित्र भारताविरुद्धच्या मागील 2-3 सामन्यांमध्ये पाहायला मिळालं नव्हतं. त्यामुळेच पाकिस्तानला नेहमी पराभवाला सामोरे जावे लागले.

पाकिस्तानने गेल्या काही वर्षांत टी-20 फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे, ज्यामुळे पाकिस्तानचा संघ आयसीसी क्रमवारीत बराच काळ पहिल्या क्रमांकावर राहिला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम देखील या फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट टायमिंग आणि फॉर्ममध्ये दिसतोय.

आयसीसी स्पर्धांमध्ये पाकिस्तानने भारताला 3 सामन्यांमध्ये पराभूत केले आहे. हे तिन्ही सामने चॅम्पियन्स ट्रॉफीचे आहेत. ज्यामध्ये 2017 ची चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आहे. या पराभवाने भारतीय चाहते प्रचंड निराश झाले होते. या सामन्यात भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे नाणेफेक जिंकल्यानंतरही कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा चुकीचा निर्णय घेतला होता.

भारतासमोर दोन अडथळे

भारताला या सामन्यात दोन स्पीड ब्रेकर्सचा सामना करावा लागणार आहे. त्यातला पहिला स्पीडब्रेकर म्हणजे कर्णधार विराट कोहलीचं महत्त्वाच्या प्रसंगी पॅनिक होणं आणि दुसरा स्पीडब्रेकर म्हणजे त्याचे असंयमी फैसले. आयपीएलपासून ते अनेक मोठ्या सामन्यांमध्ये भारतीय संघ व्यवस्थापन आणि विशेषतः कर्णधार कोहलीच्या चुका आपण पाहिल्या आहेत.

उदाहरणार्थ, 2019 विश्वचषक उपांत्य फेरीतील संघ निवडीसह एमएस धोनीच्या फलंदाजीचा क्रम बदलणे किंवा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याची संधी देणे. त्यामुळे समोरच्या संघाला स्वत:वरील दडपण दूर करण्याची पूर्ण संधी मिळाली. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की UAE हे पाकिस्तानसाठी घरच्या वातावरणात खेळण्यासारखे आहे.

पाकिस्तानी खेळाडूंना यूएईमध्ये सर्वाधिक अनुभव आहे आणि भारताने चुकांची पुनरावृत्ती केल्यास या युवा संघाला भारतावर वर्चस्व मिळवण्यास वेळ लागणार नाही. तथापि, अलीकडेच भारताच्या खेळाडूंनी देखील यूएईमध्ये आयपीएलसाठी बराच वेळ घालवला आहे.

भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

इतर बातम्या

T20 WC, Ind Vs Pak : पाकिस्तानची टीम मजबूत, त्यांच्याकडेही गेमचेंजर, PAK पत्रकाराच्या प्रश्नावर विराट कोहलीचं उत्तर

Virat Kohli Press : पाकिस्तानविरुद्धची मॅच जिंकण्यावर आमचं लक्ष, टीम इंडिया विजयासाठी सज्ज

T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मिस्ट्री स्पिनरला संधी नाही, दिग्गज सिलेक्टरने सांगितली प्लेइंग XI

(T20 world cup : Mistakes made in 2017 Champions Trophy final must not be repeated, otherwise Pakistan can beat India)

डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.