योग्य धडा शिकवू, लेबनॉनमधील पेजर स्फोटावर हिजबुल्लाचा इस्रायलला इशारा

हिजबुल्लाहच्या सैनिकांकडे असलेल्या पेजरमध्ये इस्रायलने स्फोट घडवून आणला. स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर लेबनॉनमध्ये खळबळ उडाली आहे. हजारो पेजर स्फोटांमध्ये किमान 9 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 2750 हून अधिक जखमी झाले आहेत. पेजर स्फोटासाठी हिजबुल्लाहने इस्रायलला जबाबदार धरले आहे.

योग्य धडा शिकवू, लेबनॉनमधील पेजर स्फोटावर हिजबुल्लाचा इस्रायलला इशारा
Follow us
| Updated on: Sep 18, 2024 | 2:06 AM

लेबनॉनच्या विविध भागात पेजरचा स्फोट झाल्याने हिजबुल्लाहचे अनेक सैनिक ठार झाले आहेत. या स्फोटांमध्ये ९ वर्षांच्या मुलीचाही मृत्यू झाला तर इराणचे राजदूत जखमी झालेत. लेबनीज सरकारी अधिकाऱ्यांनी या हल्ल्यासाठी इस्रायलवर आरोप केलेत. हिजबुल्लाहने लेबनॉनमधील पेजर बॉम्बस्फोटांसाठी इस्रायलला जबाबदार धरले आणि त्याला ‘योग्य शिक्षा’ मिळेल असे म्हटले आहे. संपूर्ण लेबनॉनमध्ये या स्फोटांमध्ये 2,700 हून अधिक लोक जखमी झाले. लेबनॉन सीमेवर तणाव वाढला असताना ही घटना घडली आहे. मात्र, इस्रायलच्या लष्कराने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

हिजबुल्लाहचे पेजर कसे फुटले?

हिजबुल्लाहच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ग्रुपने वापरलेला ‘हँडहेल्ड पेजर’चा आधी गरम झाला आणि नंतर स्फोट झाला. अधिकाऱ्याने सांगितले की, त्याचे किमान दोन सदस्य ठार झाले आणि इतर जखमी झाले. लेबनॉनचे आरोग्य मंत्री फिरास अबियाद यांनी सांगितले की, किमान आठ लोक ठार झाले असून 2,750 जखमी झाले आहेत. जखमींपैकी 200 जणांची प्रकृती गंभीर आहे. इराणची राज्य वृत्तसंस्था IRNA ने सांगितले की, पेजर स्फोटात देशाचे राजदूत मोजतबा अमानी किंचित जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरातील सोशल मीडिया आणि स्थानिक मीडियावर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या घटनेत काहींची प्रकृती गंभीर होती. राज्य-संचालित नॅशनल न्यूज एजन्सीने सांगितले की दक्षिण लेबनॉन, पूर्व बेका व्हॅली आणि बेरूतच्या दक्षिणी उपनगरातील रुग्णालयांनी लोकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. या भागात हिजबुल्लाची चांगली उपस्थिती आहे.

हिजबुल्लाहचे लढवय्ये फोनऐवजी पेजर ठेवायचे

हिजबुल्लाचे नेते हसन नसराल्लाह यांनी यापूर्वी या गटाच्या सदस्यांना सेलफोन न ठेवण्याचा इशारा दिला होता, ते म्हणाले होते की त्यांचा वापर इस्रायलद्वारे त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि लक्ष्यित हल्ले करण्यासाठी केला जाऊ शकतो. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने आपत्कालीन रूग्णांना आणि पेजर असलेल्यांना पेजरपासून दूर ठेवताना सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. मंत्रालयाने आरोग्य कर्मचाऱ्यांना वायरलेस उपकरणे वापरणे टाळण्यास सांगितले आहे.

लिथियम बॅटरीचा स्फोट

जेव्हा लिथियम बॅटरी जास्त गरम होते तेव्हा ती धूर सोडते, वितळते आणि आग लागते. रिचार्ज करण्यायोग्य लिथियम बॅटरी सेलफोन आणि लॅपटॉपपासून इलेक्ट्रिक कारपर्यंत सर्व गोष्टींमध्ये वापरल्या जातात. लेबनॉन आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान ही घटना घडली आहे. गाझामध्ये इस्रायल आणि हिजबुल्लाचा मित्र हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, लेबनीज अतिरेकी गट हिजबुल्ला आणि इस्रायली लष्कर यांच्यात 11 महिन्यांहून अधिक काळ जवळजवळ दररोज चकमकी होत आहेत. चकमकींमुळे लेबनॉन आणि इस्रायलमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे आणि सीमेच्या दोन्ही बाजूंनी हजारो लोक विस्थापित झाले आहेत.

Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.