Corona Virus : कोरोनामुळे ‘हे’ पहिल्यांदाच घडतंय

जगभरात कोरोनामुळे कधीही न घडलेल्या घटना घडताना दिसत आहेत. अशाच जगातील काही 10 घटनांचा आढावा. (Corona ten Interesting things).

Corona Virus : कोरोनामुळे 'हे' पहिल्यांदाच घडतंय
Follow us
| Updated on: Apr 06, 2020 | 1:17 AM

नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच देश अधिक लक्ष देत (Things happening first time in world due to corona) आहेत. अगदी जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाला महामारी म्हणून घोषित केलं आहे. तसेच ही जगासाठी आरोग्यविषय आणीबाणी असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच जगभरात कधीही न घडलेल्या गोष्टी होत असल्याचं पाहायला मिळत आहे (Corona ten Interesting things).

1. पनामा या देशानं लॉकडाऊनच्या काळात जगावेगळे नियम केले याहेत. ऑड-ईव्हन प्रमाणे या देशात मेल-फिमेल डे सुरु झालाय. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या 3 दिवसात फक्त महिलांना अत्यावश्यक गोष्टींसाठी घराबाहेर बाहेर पडण्याची मूभा आहे. तर इतर दिवसांमध्ये पुरुषांना घराबाहेर पडता येणार आहे. मात्र घराबाहेर फक्त 2 तास राहण्याची परवानगी सरकारनं दिली आहे. याशिवाय शासकीय कर्मचारी आणि समाजसेवक यांच्याद्वारेच असंख्य घरांमध्ये दोन वेळचं जेवण पाठवलं जातंय. पनामामध्ये एकूण 1800 कोरोना रुग्ण आहेत.

2. चेक प्रजासत्ताक या देशानं सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणं सक्तीचं केलंय. तसा नियमच तिथल्या सरकारनं केलाय. एकवेळ तुम्ही कपडे घातले नाहीत, तरी चालतील.. मात्र मास्क असायलाच हवा, या शब्दात तिथल्या सरकारनं सूचना देत मास्क किती गरजेचा आहे हे लोकांना पटवून दिलंय. चेक प्रजासत्ताक हा मध्य युरोपातला देश आहे. जर्मनी आणि पोलंडला लागून असलेला हा देश याआधी चेकोस्लोव्हाकियाचाच एक भाग होता.

3. पाकिस्तानच्या हवाई कंट्रोल विभागानं इतिहासात पहिल्यांदाच एअर इंडियाच्या कार्याला सलामी दिलीय. संकटकाळात एअर इंडियाचे कर्मचारी ज्या पद्धतीनं मदत करत आहेत, त्याचा आम्हाला अभिमान असल्याचे कौतुगोद्वगार कराचीच्या एअर कंट्रोल ऑफिरसरनं काढले आहेत. लॉकडाऊनमुळे भारतात अडकलेल्या युरोपियन लोकांना एअर इंडियाच्या विमानानं मायदेशी नेण्यात आलं. तेव्हा भारतातून युरोपसाठी उडालेल्या विमानानं जेव्हा पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश केला, तेव्हा कराचीच्या एटीसीच्या अधिकाऱ्यानं विमान कुठं जात असल्याची विचारणा केली. भारतीय पायलटनं सर्व माहिती सांगितल्यानंतर पाकिस्तानच्या अधिकाऱ्यानं अशा परिस्थितीतही एअर इंडिया कार्यशील आहे, त्याचा आम्हाला अभिमान वाटत असल्याचं म्हटलं.

4. अमेरिकेनं भारताकडे हायड्रोलक्लोरोक्विनच्या टॅबलेट्सची मागणी केली आहे. हायड्रोक्लोरोक्विनमुळे कोरोनाच्या काही केसेसमध्ये चांगला परिणाम जाणवतोय. सध्या जगभरात हायड्रोक्लोरोक्विनचा सर्वाधिक साठा भारताकडेच असल्याची माहिती आहे. ट्रम्प यांनी भारताकडे मदतीची मागणी करतानाच, भारताची लोकसंख्या मोठी आहे, त्यांना सुद्धा हायड्रोक्लोरोक्विनची गरज भासेल, मात्र अशा काळात भारतानं मदत केली, तर आम्ही कायम आभारी राहू, असं ट्रम्प म्हणाले आहेत.

5. कोरोनाच्या हाहाकारात भारतात एक सुखद घटना घडलीय. दिल्लीत एका कोरोनाग्रस्त महिलेनं निरोगी बाळाला जन्म दिला आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात ही डिलीव्हरी झाली. संबंधित महिलेचा पती सुद्धा डॉक्टर आहे. दोघांनाही कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे डिलीव्हीरीनंतर त्यांच्या बाळाची चाचणी घेतली गेली. ती चाचणी निगेटिव्ह आलीय. कोरोनाग्रस्त गर्भवती महिलेनं एका निरोगी बाळाला जन्म देण्याची बहुदा ही पहिलीच घटना आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून दोघांनाही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलंय. दैनिक पुढारीनं ही बातमी प्रसिद्ध केलीय.

6. लॉकडाऊनमुळे एका गावात चक्क हत्ती शिरल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हत्ती गावातल्या भररस्त्यावरुन चालत असताना अचानक त्याच्यापुढे एक दूधवाला आला. रस्त्यावर चक्क हत्ती समोर दिसल्यामुळे त्यानं हत्तीला पाहून गाडी सोडून पळ काढला. मात्र हत्तीनं कुणालाही इजा न करता तिथून निघूनही गेला. दरम्यान, केरळमधल्या अनेक रस्त्यांवर लॉकडाऊनच्या काळात हत्ती मनमोकळेपणे रस्त्यांवर फिरताना दिसतायत.

7. कोरोनाच्या फैलावानंतर पहिल्यांदाच चीनी लोकांचा एक समूह माऊंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी निघाला आहे. चीननं त्यांच्याकडच्या भूभागावरुन गिर्यारोहनाला परवानगी दिलीय. मात्र तूर्तास फक्त चीनी लोकांनाच गिर्यारोहनाची मूभा आहे. इकडे नेपाळनं मात्र देशातील आणि परदेशातील अशा दोन्ही लोकांसाठी माऊंट एव्हरेस्टवरचं गिर्यारोहण बंद केलंय. जर कोणीही एव्हरेस्टवर संक्रमित झाला, तर इतक्या उंच ठिकाणी त्याच्यावर उपचार करणं अवघड होईल, असं मत तिबेट गिर्यारोहण संघानं व्यक्त केलंय.

8. शनिवारी (4 एप्रिल) 24 तासात संपूर्ण भारतात 525 नवे कोरोनाबाधित सापडले. भारतात आतापर्यंत 24 तासात इतके रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. चिंतेची गोष्टी म्हणजे या 525 पैकी एकट्या महाराष्ट्रात 145 नवे रुग्ण सापडले. महाराष्ट्रात सुद्धा 24 तासात इतके रुग्ण याआधी कधी आढळलेले नव्हते. दरम्यान, काल देशभरात 75 जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे.

9. ईशान्य भारतातल्या 7 राज्यांमध्ये 2 एप्रिलपर्यंत अधिकृतपणे फक्त तीनच रुग्ण कोरोनाग्रस्त सापडले आहेत. अरुणाचल प्रदेशात 1, मणिपुरात 1 आणि मिजोराममध्ये एका रुग्णांची नोंद केली गेलीय. तर सिक्कीम, त्रिपुरा, मेघालय, नागालँड या चारही राज्यात अद्याप एकही कोरोनारुग्ण नसल्याची माहिती आहे. मात्र संपूर्ण देशात जवळपास राज्य आणि केंद्रशासीत प्रदेश मिळून 32 राज्यांमध्ये कोरोना पोहोचला आहे.

10. पुणेकरांनी फक्त दोनच दिवसात कराच्या रुपात 19 कोटी रुपये महापालिकेकडे जमा केले आहेत. एरव्ही मार्च एन्डिंगवेळी कराच्या रुपात एका महिन्यात 35 ते 36 कोटी जमा होतात.. मात्र लॉकडाऊनच्या काळात सर्व लोक घरीच असल्यामुळे फक्त दोनच दिवसात पुणेमहापालिकेत 19 कोटी रुपये जमले आहेत. इतक्या कमी कालावधीत कर रुपात पैसे जमा होण्याची पुणे महापालिकेच्या इतिहासातली ही पहिलीच घटना आहे.

संबंधित बातम्या:

कोरोनामुळे जगात पहिल्यांदाच घडत आहेत ‘या’ दहा गोष्टी

‘जनता कर्फ्यू’ आणि ‘कोरोना’बाबत 10 विलक्षण गोष्टी

दारुऐवजी सॅनिटायझरची निर्मिती, जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडणाऱ्या 10 गोष्टी

Things happening first time in world due to corona

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.