Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राची समृद्धी! मुंबई-नागपूर महामार्ग येत्या 2 महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार, शिर्डी ते नागपूर प्रवास करता येणार!

महाराष्ट्राच्या समृद्धीची द्वारं खुली करणारा मुंबई-नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग येत्या दोन महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात नुकतीच दिली.

महाराष्ट्राची समृद्धी! मुंबई-नागपूर महामार्ग येत्या 2 महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार, शिर्डी ते नागपूर प्रवास करता येणार!
नागपूर ते शिर्डी महामार्ग येत्या दोन महिन्यात सुरु होणार
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 11:46 AM

मुंबईः महाराष्ट्राच्या समृद्धीची द्वारं खुली करणारा मुंबई-नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) येत्या दोन महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका कार्यक्रमात नुकतीच दिली. ते म्हणाले, महाराष्ट्रासाठी हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून येत्या दोन महिन्यात यातील शिर्डी ते नागपूर (Shirdi to Nagpur) हा महामार्ग सुरु होईल. समृद्धी महामार्ग हा नागपूर ते मुंबई दरम्यान 12 जिल्ह्यांतून जाणार आहे. मुंबईतील भारतातील सर्वात मोठे बंदर जवाहरलाल नेहरू बंदर ते नागपूरमधील मिहान एअरपोर्ट (Mihan Airport) यांना जोडणारा हा महामार्ग आहे. बंदरातून जलद वाहतूक करून आवश्यक माल संपूर्ण भारतात वेळेवर पोहोचवणे या मार्गाद्वारे शक्य होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बुस्टर डोस समजला जाणारा हा बहुचर्चित मार्ग कधी सुरु होतोय, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तो पुढील दोन महिन्यात वाहतुकीसाठी खुला होईल, असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे समृद्धी महामार्गाविषयी बोलताना म्हणाले की, राज्य सरकार संपूर्ण महाराष्ट्रभर उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच दळणवळणाच्या सुविधा वाढवण्यासाठी रस्त्यांचे जाळे विणत आहे. सध्याच्या काळात पर्यावरण जपणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आम्हा या महामार्गाच्या बाजूला ग्रीन झोन उभा करत आहोत. तसेच मुंबई ट्रान्सहार्बर लिंकदेखील सप्टेंबर 2023 पर्यंत सुरु होईल, असे त्यांनी सांगितले.

गडचिरोलीपर्यंत वाढवणार?

या महामार्गाविषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘हा महामार्ग केवळ नागपूरपर्यंत न ठेवता, गोंदीया, भंडारा, गडचिरोलीपर्यंत पोहोचवायचा आहे. त्यामुळे नक्षलग्रस्त जिल्हा ही गडचिरोलीची ओळख पूसता येईल आणि विकासाची गंगा येथेही वाहू लागेल.’ एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असून जिल्ह्याच्या विकासासाठी हा मार्ग ते गडचिरोलीपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.

कोणत्या जिल्ह्यांना जोडणार समृद्धी मार्ग?

नागपूर ते मुंबई असे 700 किलोमीटरचे अंतर ताशी 150 किमी वेगाने पार करण्याची क्षमता असलेला महामार्ग महाराष्ट्र सरकार विकसित करत आहेत. यालाच बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे म्हटले जाते. हा मार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे व मुंबई या 12 जिल्ह्यांना जोडणार आहे. या जलद मार्गाचा फायदा चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर व रायगड यांनाही अप्रत्यक्षपणे होणार आहे. म्हणजेच जवळपास 26 तालुके व 392 गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे.

औरंगाबादमध्ये कसा आहे मार्ग?

नागपूर ते मुंबई अशा 700 किमी अंतरापैकी हा रस्ता औरंगाबाद जिल्ह्यातून 112 किमी लांबीचा असेल. त्याची रुंदी 120 मीटर रुंदीची असून तो 6 पदरी असेल. जिल्ह्यातील औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर या तीन तालुक्यांतील 71 गावांमधून समृद्धी महामार्ग गेला आहे. पोखरी शिवारात 290 मीटर लांबीचा बोगदा अंतिम टप्प्यात आहे. सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव, जांबरदाव या 5 ठिकाणी इंटरचेंजचे काम अंतिम टप्प्यात आहे.

इतर बातम्या-

सदानंदाचा उदो उदो.. लाखो गरीबांचा कैवारी खंडेराया का झाला एवढा लोकप्रिय? चंपाषष्ठीच्या निमित्ताने वाचा Special Report

Bipin Rawat : रावत यांच्याबरोबर अनेक रहस्य संपली, हेलिकॉप्टर अपघाताने सर्वोच्च नेतृत्वही गोंधळलं: संजय राऊत

भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल
भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल.
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न.
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने.
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला.
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.