NCP Sharad Pawar | पंतप्रधान पुण्यात येताहेत त्यांचं स्वागत, पण ढगफुटी झाली तर आपल्यालाच बघायचं आहे; शरद पवारांचा मोदींना खोचक टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या प्रकल्पाचे उदघाटन केले जाणार आहे. एवढंच नव्हे तर मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पाचे भूमीपूजनही त्याच्या हस्ते करण्याच्या निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला आहे. मात्र या नदी सुधार प्रकल्पामुळे भविष्यात अडचणी निर्माण होतील असे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
पुणे – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) उद्या इथं मेट्रोच्या उद्घाटनासाठी येत आहेत. मात्र मेट्रो प्रकल्पपूर्ण झाला नसतानाही त्याच उद्घाटन केलं जातंय. मला मेट्रो दाखवली आहे , माझ्या लक्षात आलं की सगळं काही काम झालं नाही. सगळं काम झालं नाही तरी उद्घाटन करायचा घाट घातला आहे. दुसरीकडे जायका प्रकल्पाच्या माध्यमातूना मुळा मुठा नदी(Mula -Mutha rivres) नदीसुधार योजनेचा प्रकल्प राबवला जाणारा आहे. मात्र याची काळजी वाटते कारण नदीच पात्र अरूंद होऊन रस्ते आणि फिरायचं ठिकाण होणार आहे. मी काही इंजिनिअर नाही. पण मला माहिती आहे वर धरणं आहे , उद्या ढगफुटी झाली तर पाणी कुठं जाईल, मात्र तज्ञांनी विचार केलाय तर हरकत नाही. मात्र संकट आलं तर त्याची झळ सर्वसामान्यांना बसेल. मी पानशेत फुटलं तेव्हा मी आमचा दूकानंदार आहे का बघायला गेलो होतो देशाचे पंतप्रधान इथं येतायेत त्याचं स्वागत आहे, पण मात्र ढगफुटी झालं तर आपल्यालाच बघायचं आहे. असा खोचक टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(NCP Sharad Pawar) यांनी केली आहे.
नदीसुधार प्रकल्पासंदर्भात बैठक घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या प्रकल्पाचे उदघाटन केले जाणार आहे. एवढंच नव्हे तर मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पाचे भूमीपूजनही त्याच्या हस्ते करण्याच्या निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला आहे. मात्र या नदी सुधार प्रकल्पामुळे भविष्यात अडचणी निर्माण होतील असे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे मी नदीसुधार प्रकल्पासंदर्भात बैठक घेण्याचा प्रयत्न करणार आहे. जर काळजी घेतली नाही तर जलसंपदा विभागानं सूचना केली आहे ती पत्र सूचना मी वाचली आहे , ढगफुटी किंवा काय त्याची झळ पुणेकरांना नको
महाराष्ट्र संकटात असताना घरात बसणं मला जमलं नाही आपण ऐका एका संकटातून जातोय. कोरोना आला. एक एक महिना दार बंद करून घरात बसावं लागलं. काम थांबलं होत. महाराष्ट्रात आपलं भाग्य आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,अजित पवार यांनी दिवसाचा रात्र करून सुविधा कशी देता येईल यासाठी प्रयत्न केला. मी तेव्हा ठिकठिकाणी फिरलो मला तेव्हा सांगायचे घरात बसा मात्र महाराष्ट्र संकटात असताना घरात बसणं मला जमलं नाही. मंत्रीमंडळातले मंत्री चांगले काम करत होते, जालन्यातील शेतकरी कुटुंबातील राजेश टोपेंनी चांगलं काम केल. काही जिल्ह्यात गेलो तेव्हा लोक त्याला डॉक्टर म्हणायला लागले. कोणता पक्ष , गट न मानता माणूस म्हणून काम केलं . त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र कोरोनामुक होतंय या शब्दात महाविकास आघाडीतील मंत्र्यांचे कौतुक केलं आहे.
“इतका राग होता ‘उच्चवर्णिय प्रस्थापितांवर’ तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला?”, ‘झुंड’वर टीकेचे बाण
Cashew : काजू बीच्या बाबतीत बाजारपेठेचे सूत्र ही मोडले, उत्पादन अन् दरही घटले, काय आहेत कारणे?