शिर्डीतील साई मंदिरात सोमवारपासून 6 हजार भाविकांना दर्शनाची सोय; पण ऑनलाईन बुकिंग सक्तीची!

राज्य सरकारने मंदिरं खुली करण्यास परवानगी दिल्यानतंर शिर्डीतील साईमंदिर येत्या सोमवारपासून साईदर्शनासाठी खुले होणार आहे. त्यासाठी भाविकांना ऑनलाईन बुकिंग करावी लागणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानने दिली आहे.

शिर्डीतील साई मंदिरात सोमवारपासून 6 हजार भाविकांना दर्शनाची सोय; पण ऑनलाईन बुकिंग सक्तीची!
Follow us
| Updated on: Nov 14, 2020 | 6:19 PM

अहमदनगर : राज्य सरकारने मंदिरं खुली करण्यास परवानगी दिल्यानतंर शिर्डीतील साईमंदिर येत्या सोमवारपासून साईदर्शनासाठी खुले होणार आहे. त्यासाठी भाविकांना ऑनलाईन बुकिंग करावी लागणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानने दिली आहे. (The Sai Mandir in Shirdi will be open for Darshan from Monday)

शिर्डीतील साईमंदिरात दररोज 6 हजार भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे. ज्या भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करुन ठेवलेले आहे; त्यांनीच शिर्डीत यावे असे आवाहनदेखील साईबाबा संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

सोमवारी (16 नोव्हेंबर) पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साई मंदिरदेखील दर्शनासाठी खुले केले जाणार आहे. मागील आठ महिन्यांपासून राज्यातील सर्व मंदिरं बंद होती. त्यानंतर आता साईबाबा संस्थानने सोमवारपासून दररोज 6 हजार भाविक दर्शन घेऊ शकतील, अशी व्यवस्था केली आहे. मात्र, साईदर्शनासाठी यायचे असेल तर, त्यासाठी भाविकांना आगाऊ ऑनलाईन बुकिंग करावे लागेल. तसेच ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलेले असेल त्यांनीच शिर्डीत यावे, कोरोना प्रतिबंधंक सर्व नियम पाळावेत, असे आवाहन साईबाबा संस्थेने केले आहे.

सरकारने प्रार्थनास्थळं सुरु करण्यास परवानगी दिल्यामुळे सर्व धर्मीय भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सरकारच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाबाबात सर्व नियम पाळूनच शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाची व्यवस्था केली असल्याचे साई ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी सांगितलं. तसेच भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी दर्शनाची व्यवस्था पूर्ण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, येत्या सोमवारी (16 नोव्हेंबर) पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. मात्र प्रार्थनास्थळ खुली केल्यानंतर भाविकांना काही नियमावली पाळणे गरजेचे असणार आहे. हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा! असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

Temple Reopen | राज्यातील मंदिर सोमवारपासून उघडणार, पण ‘हे’ नियम सक्तीचे

उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला, मंदिरे सुरु करण्याच्या भाजपच्या दबावाला पडले नाहीत: प्रताप सरनाईक

(The Sai Mandir in Shirdi will be open for Darshan from Monday)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.