धक्कादायक: औरंगाबादेत आठवडाभरातच आणखी एक क्रूर हत्या, पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून पतीचीही आत्महत्या

| Updated on: Oct 18, 2021 | 11:02 AM

औरंगाबाद: शहरातील मौलाना आझाद कॉलेजमधील प्रोफेसर डॉ. राजन शिंदे (Dr.Rajendra Shinde) यांच्या क्रूर हत्येचं गूढ अजून उकललेलं नसताना आठवड्यानंतरच आणखी एक क्रूर हत्या झाल्याचं समोर आलं आहे. रविवारी  गंगापूर तालुक्यात पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून पतीने स्वतःच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. डॉ. शिंदे यांचा अत्यंत क्रूरपणे खून करणाऱ्या खुन्याचं नाव आज पोलिसांकडून उघड होण्याची […]

धक्कादायक: औरंगाबादेत आठवडाभरातच आणखी एक क्रूर हत्या, पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून पतीचीही आत्महत्या
मृच गंगाबाई चंपालाल बिघोत आणि मृत चंपालाल तान्हासिंग बिघोत
Follow us on

औरंगाबाद: शहरातील मौलाना आझाद कॉलेजमधील प्रोफेसर डॉ. राजन शिंदे (Dr.Rajendra Shinde) यांच्या क्रूर हत्येचं गूढ अजून उकललेलं नसताना आठवड्यानंतरच आणखी एक क्रूर हत्या झाल्याचं समोर आलं आहे. रविवारी  गंगापूर तालुक्यात पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून पतीने स्वतःच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. डॉ. शिंदे यांचा अत्यंत क्रूरपणे खून करणाऱ्या खुन्याचं नाव आज पोलिसांकडून उघड होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अवघ्या शहराचं लक्ष तिकडे लागलं असतानाच गंगापूरमधील या निर्घृण हत्येमुळे औरंगाबाद शहराला आणखी एक हादरा बसला आहे.

पत्नीचा खून करून पतीची विहिरीत उडी

औरंगाबादेत आठवड्याभरातच झालेली ही दुसरी हत्या गंगापूर तालुक्यातील टाकळीचीवाडी येथे घडली. घरगुती कारणावरून 55 वर्षीय पतीने48 वर्षीय पत्नीची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. त्यानंतर स्वत:ही शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. हा प्रकार रविवारी पहाटे गंगापूर तालुक्यातील टाकळीचीवाडी येथील गट क्र. नऊमध्ये घडला. चंपालाल तान्हासिंग बिघोत व गंगाबाई चंपालाल बिघोत अशी मृतांची नावे आहेत. या खुनाचे व आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घरासमोरील ओट्यावरच त्याने घातले घाव

बिघोत दांपत्य घरासमोरील ओट्यावर झोपले होते. पहाटे तीनच्या सुमारास चंपालाल यांनी मुलगा राहुलच्या घराचा दरवाजा बाहेरून बंद केला. त्यानंतर ओट्यावर झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात मागच्या बाजूला कुऱ्हाडीने वार केला. गंगाबाई जिवाच्या आकांताने ओरडल्या. त्यामुळे मुलगा जागा झाला. खिडकीतून त्याने पाहिले असता आई रक्ताच्या थारोळ्यात होती, पण दरवाजा बंद असल्याने तो बाहेर येऊ शकला नाही. त्याने तत्काळ दुसऱ्या दरवाजाने बाहेर येऊन नातेवाइकांच्या मदतीने आईला घाटीत नेले पण तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.

खूनाचे कारण अद्याप उलगडले नाही

दरम्यान बिघोत दाम्पत्यामध्ये काही घरगुती वाद होते का, याचा तपास पोलीस करत आहेत. अद्याप या खूनाचे आणि आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही.

डॉ. शिंदे खूनः अधिकारी, पोलीस आज स्पॉटवर ठाण मांडून!

दरम्यान, औरंगाबादमधील प्रोफेसर डॉ. राजन शिंदे खून प्रकरणात आज हत्याराचे नाव उघड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. प्रश्न आणि चौकशीच्या असंख्य फेऱ्या झाल्यानंतर सात दिवसांनंतर पोलीस हत्यारापर्यंत पोहोचले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून कळते आहे. मात्र सबळ पुराव्या अभावी त्यांना हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव उघड करता येत नाही. हत्यारानं ज्या विहिरीत शस्त्रे टाकली, त्या विहिरीतील पाणी, कचरा उपसण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहे. आयुक्त डॉ निखील गुप्ता साहेबांचे मार्गदर्शनाखाली तपास यंत्रणाची पाहणी सुरु आहे. तपासणी अधिकारी व कर्मचारी ,अनेक पत्रकार , छायाचित्रकार या जागेवर उपस्थित आहेत. आज या विहिरीतून ठोस पुरावे मिळतील, अशी दाट शक्यता आहे. किंवा पोलीस काहीतरी निष्कर्षाप्रत येऊन गुन्ह्याची उकल करतील, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

इतर बातम्या-

विकृतीचा कळस, डॉक्टर महिलेला व्हिडीओ कॉलवर NUDE होण्यास सांगितलं; त्यानंतर जे घडलं त्याने महिलाही अक्षरश: हादरली

खतरनाक… पती मोबाईल देत नाही, पत्नीने विळ्याने पतीचे ओठ कापले