‘तांडव’च्या दिग्दर्शक आणि कलाकारांची जीभ कापा आणि 1 कोटी मिळवा: करणी सेना

तांडव (Tandav) वेब सीरीजचा वाद काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीये.

'तांडव'च्या दिग्दर्शक आणि कलाकारांची जीभ कापा आणि 1 कोटी मिळवा: करणी सेना
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 4:12 PM

मुंबई : तांडव (Tandav) वेब सीरीजचा वाद काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी तांडव वेब सीरीज संदर्भात एक मोठं वक्तव्य केले आहे ते म्हणाले की, तांडव वेब सीरीजमधील कलाकार आणि दिग्दर्शक यांची जीभ कापून देणाऱ्याला महाराष्ट्र करणी सेनेकडून एक कोटी रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. (The Tandav web series controversy escalated)

मोहम्मद पैंगबर यांचा अपमान करणाऱ्या कमलेश तिवारीला मुस्लिमांनी गळा कापून त्यांची हत्या केली. तसेच ते म्हणाले की, जेव्हा त्यांना त्यांच्या धर्माबद्दल इतका अभिमान आहे तर आपल्याला नाही का?, तांडवचे निर्माते-दिग्दर्शकाने माफी मागितली आहे, परंतु कमलेश तिवारीने ही माफी मागितली होती तरी त्यांना माफ केले नव्हते. मग आम्ही का माफ केले पाहिजे.

‘तांडव’ (Tandav) या वेब सीरिजमधून हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे होत असलेल्या चौफेक टीकेनंतर ‘तांडव’चे निर्माते अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) यांनी माफी मागितली होती. मात्र, अली अब्बास जफरने माफी मागूनही काही विशेष फरक पडलेला दिसत नाही. ट्विटरवर एक निवेदन जारी करून अली अब्बास जफर यांनी सर्वांची माफी मागितली होती.

अली अब्बास जफर यांनी या वेब सीरीजचे दोन मुख्य भाग असल्याचं म्हटलं होतं. पहिला भाग डिस्क्लेमर सारखा आहे. तो सीरीज सुरू होण्यापूर्वी दाखवलेला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या भागात त्यांनी टीकेचा उल्लेख केला आहे. याच भागामुळे वाद निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ही वेब सीरीज पाहिल्यानंतर ज्या कुणी आक्षेप घेतला आहे, त्या सर्वांची माफी मागत असल्याचं जफर यांनी म्हटलं आहे. तांडव रिलीज झाल्यानंतर आम्ही प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवर लक्ष ठेवून होतो. या सीरीजवरून आमची माहिती आणि प्रसारण मंत्रालायशी चर्चा झाली. त्यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या सीरीजमुळे जनतेच्या भावना दुखावल्या असून त्यामुळे अनेक केसेस दाखल झाल्याचं आम्हाला सांगितलं.

संबंधित बातम्या : 

Shocking | राम गोपाल वर्माचं वादग्रस्त वक्तव्य, दाऊद इब्राहीमचे मानले आभार!

कंगनाचा पुन्हा स्वराशी पंगा, प्रत्युत्तराने फॅन्सचा सोशल मीडियावर दंगा…!

(The Tandav web series controversy escalated)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.