Corona vaccine | कोव्हॅक्सीन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात, एम्समधील न्युरोसायन्स सेंटरच्या प्रमुखांना पहिला डोस
भारत बायोटेक या कंपनीकडून विकसित केली जाणाऱ्या काव्हॅक्सीन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना सुरुवात झाली आहे. (corona vaccine covaxin)
नवी दिल्ली : भारत बायोटेक या कंपनीकडून विकसित केली जाणाऱ्या काव्हॅक्सीन (Covaxin) लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना सुरुवात झाली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालायात ही चाचणी सुरु झाली आहे. या लसीच्या चाचणीसाठी पहिला डोस एम्स रुग्णालयातील न्युरोसायन्स सेंटच्या प्रमुखांना देण्यात आला आहे. (third phase testing of Corona vaccine Covaxin started in AIIMS)
मिळालेल्या माहितीनुसार भारत बायोटेक आणि आयसीएमआर (ICMR) यांच्याकडून कोव्हॅक्सीन नावाची लस विकसित करण्यात येत आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी पहिला डोस हा एम्स रुग्णालयातील न्युरोसायन्स सेंटरचे प्रमुख डॉ. एम. वी. पद्म श्रीवास्तव आणि अन्य तीन स्वयंसेवकांना देण्यात आला आहे.
या आधी 20 नोव्हेंबर रोजी कोव्हॅक्सीन लसीच्या तिसऱ्या टप्पयातील चाचणीला हरियाणा राज्यातील रोहतक येथे सुरुवात झाली. देशात ठिकठिकाणी एकूण 25 हजार 800 स्वयंसेवकांवर या लसीची चाणणी करण्यात येईल. या लसीचे दोन डोस असतील. पहिला डोस दिल्यानंर 28 दिवसांनतर दुसरा डोस देण्यात येईल. हैदराबाद, गोवा, रोहतक येथे 200-200 स्वयंसेवकांना पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांनातर त्यांना कोव्हॅक्सीन लशीचा दुसरा डोस देण्यात येईल.
2021 च्या पहिल्या तिमाहीत लस
भारत बायोटेकने कोव्हॅक्सीन लस 2021 च्या पहिल्या तिमाहित सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. भारत बायोटेकचे प्रमुख साई प्रसाद यांनी सांगितले की तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निकाल बाहेर आल्यानंतर यावर काम करता येईल. तसेच, लसीच्या चाचणीचा चौथा टप्पदेखील पूर्ण केला जाईल असे प्रसाद यांनी सांगितले. साई प्रसाद यांनी सांगितले की, काव्हॅक्सीन लस 60 टक्के प्रभावी असेल. आम्ही त्यासाठी प्रयत्न करु.
‘मोदींनाही प्रचाराला आणा, हैदराबादमध्ये तुमच्या किती जागा येतात पाहू’, ओवेसींचं भाजपला आव्हानhttps://t.co/rMhj8jtOFV#PMModi #Hyderabad #BJP
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 26, 2020
संबंधित बातम्या :
कोरोना लसीकरणाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार , आगामी अर्थसंकल्पात 500 अब्ज रुपयांची तरतूद?
कोरोना लसीच्या बातमीनं सोने दरात घसरण, 5 दिवसांत सोने किती रुपयांनी घसरलं?
(third phase testing of Corona vaccine Covaxin started in AIIMS)