हे पहिल्यांदा घडतंय : कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत 12 व्या स्थानी, चीननंतर भारताचा क्रमांक

जगभरासह देशात कोरोना विषाणूने हाहा:कार माजवला आहे. कोरोनाने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला (Things Happening First Time) आहे.

हे पहिल्यांदा घडतंय : कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत 12 व्या स्थानी, चीननंतर भारताचा क्रमांक
Follow us
| Updated on: May 13, 2020 | 2:14 PM

मुंबई : जगभरासह देशात कोरोना विषाणूने हाहा:कार माजवला आहे. कोरोनाने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला (Things Happening First Time) आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर काही देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधीही वाढवला आहे. भारतातही लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरात (Things Happening First Time) अनेक गोष्टी पहिल्यांदा घडत आहेत. त्याचा हा आढावा

1. कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत पहिल्यांदाच 12 व्या स्थानी पोहोचला आहे. काल एकाच दिवसात भारतानं पेरु आणि कॅनडा या दोन्ही देशांना मागे टाकलं. आता जागतिक कोरोनाच्या आकडेवारीत 11 व्या स्थानी चीन आणि 12 स्थानी भारताचा क्रमांक आहे. मागच्या 4 दिवसांपासून ज्या वेगानं भारतात कोरोनाचे रुग्ण वाढतायत, त्याच वेगानं पुढचे 4 दिवस जर रुग्ण वाढले, तर 16 मे पर्यंत भारत कोरोनाच्या संख्येत चीनलाही मागे टाकेल.

2. भारतात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी मागच्या 24 तासात 10 राज्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. गोवा, अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीसह अनेक राज्यांचा यात समावेश आहे. शनिवारी देशात 86 हजार चाचण्या झाल्याची माहिती आहे. ती क्षमता वाढवून आता देशात प्रत्येक दिवसाला 95 हजार चाचण्या करण्याचं लक्ष्य आहे.  इतर राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचीही संख्या वेगानं वाढू लागलीय.

3. न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर एक मोठं घड्याळ लावण्यात आलं आहे. ज्याला ट्रम्प डेथ क्लॉक असं नाव दिलं गेलंय. या घड्याळात 48 हजारांचा आकडा दाखवला गेलाय. खरं तर अमेरिकेत 48 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र ज्यांनी हे घड्याळ लावले आहे., त्यांच्या दाव्यानुसार हे 48 हजार अमेरिकन लोक हे ट्रम्प सरकारच्या अपयशामुळे दगावले आहेत. चित्रपट दिग्दर्शक युजीन जेर्की यांनी हे घड्याळ लावल्याची माहिती आहे. या घड्याळ्याद्वारे ट्रम्प यांच्या कारभारावर टीका आणि लॉकडाऊन हटवण्याच्या निर्णयाचा विरोध सुद्धा केला जातोय.

4. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, रशिया आणि स्पेनसह अनेक देशांमधल्या आकाशात एक निळ्या रंगाचा प्रकाश दिसला आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतल्या यूएफओच्या घटनांनंतर या निळ्या रंगाच्या प्रकाशाबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातंय. डेली स्टारच्या दाव्यानुसार आकाशात हा निळ्या रंगाचा प्रकाश सात मिनिटांपर्यंत दिसत होता. ऑस्ट्रेलियातल्या काही लोकांनी मात्र याबाबत आश्चर्यकारक मतं व्यक्त केली आहेत. निळ्या रंगाचा प्रकाश हा कोणत्याही एलियन्सची संबंधित नसून एखाद्या देशानं गुप्त पद्धतीनं एखादी चाचणी घेतलेली असू शकते, अशी मतं ऑस्ट्रेलियात व्यक्त केली गेली.

5. अमेरिकेची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होतेय. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यानं मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. धक्कादायक म्हणजे अमेरिकन लोक हे चारचाकी गाड्या घेऊन अन्नाची पाकिटं घ्यायला पोहोचतायत. फूड मार्केटबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ट्विटरवरुन शेअर झालेला एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओद्वारे अमेरिकेत अनेक भागांमधली अवस्था भीषण होत चालल्याचं समोर येऊ लागलं आहे.

6. लॉकडाऊनच्या काळात सुरु झालेल्या रेल्वे गाड्यांना तुफान प्रतिसाद मिळतोय. सरकारी उत्पन्नाचे सर्व स्रोत बंद असले तरी रेल्वेनं काही तासातच मोठा महसूल सरकारच्या हाती दिलाय. फक्त 3 तासात रेल्वेला 10 कोटी रुपयाांचं उत्पन्न मिळालंय. इकॉनॉमिक टाईम्सनं रेल्वे अधिकाऱ्याच्या हवाल्यानं ही बातमी दिलीय. त्याशिवाय इतर रेल्वे गाड्यांचंही बुकिंग फुल्ल झालंय. मात्र रेल्वे प्रवासात लोकांना जास्तीत जास्त खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

7. लॉकडाऊनमुळे दुर्लभ होत जाणारा ब्लू ड्रॅगन अमेरिकेतल्या काही समुद्र किनाऱ्यांवर पुन्हा आढळून आला आहे. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जातंय. ब्लु ड्रॅगन हा निळ्या रंगाचा एक समुद्री जीव आहे. ड्रॅगनसारख्या आकाराचा दिसत असल्यामुळे त्याला ब्लू ड्रॅगन म्हटलं जातं. अनेक वर्षांपासून दुर्लभ झालेले ब्ल्रॅ ड्रॅगन लॉकडाऊनच्या काळात अचानक मोठ्या संख्येनं दिसू लागले आहेत.

8. लॉकडाऊनमध्ये दिल्लीच्या विमानतळावर जर्मनीतला एक मोस्ट वॉन्टेड आरोपी अडकून पडलाय. मागच्या 54 दिवसांपासून तो दिल्ली विमानतळावरच आहे. हिंदूस्थान टाईम्सच्या बातमीनुसार संबंधित व्यक्ती इस्तांबुलला जाण्यासाठी दिल्ली विमानतळावर उतरला होता. मात्र भारतात लॉकडाऊन झाल्यामुळे तो भारतातच अडकून पडला. दरम्यान, भारतीय अधिकाऱ्यांनी दिल्लीतल्या जर्मन दुतावासाला याबाबत माहिती दिली. मात्र तो व्यक्ती आमच्या देशाचा आरोपी असल्यामुळे आम्ही त्याला दुतावासात आश्रय देणार नसल्याचं जर्मनीच्या दुतावासानं स्पष्ट केलं आहे.

9. जपानच्या इतिहासात पहिल्यांदाच तिथल्या एका लोकप्रिय कार्टून मालिकेला आपले एपिसोड पुनःप्रक्षेपित करावे लागले. मालिकेच्या 45 वर्षांच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलंय.  लॉकडाऊनमुळे कलाकारांना डबिंग आणि इ़डिटिंग करता आलं नाही,. त्यामुळे मालिकेचे जुने भाग पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला. साजाए सान असं या कार्टून मालिकेचं नाव आहे. फक्त लहान मुलचं नव्हेत तर अनेक जपानी कुटुंब दर रविवारी संध्याकाळी ही कार्टून मालिका नित्यनेमानं पाहतात.

10. वुहानमध्ये पुन्हा कोरोनाचे 5 रुग्ण सापडल्यानंतर चीनी प्रशासन कामाला लागलंय. एका माहितीनुसार वुहान शहरामधल्या लोकांची पुन्हा एकदा चाचणी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी चीन सरकारनं हालचाली सुद्धा सुरु केल्या आहेत. तब्बल 30 दिवस वुहानमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण न सापडल्यानंतर अचानक 5 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे चीन प्रशासन पुन्हा खळबळून जागं झालंय. ज्या आरोग्य अधिकाऱ्यावर वुहानची जबाबदारी होती., त्याला तातडीनं निलंबित सुद्धा केलं गेलंय.

संबंधित बातम्या :

हे पहिल्यांदा घडतंय : जपानमध्ये विद्यापीठाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांऐवजी चक्क रोबो सहभागी

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.