मालेगावमध्ये चरससारख्या अमली पदार्थाची विक्री; पोलिसांच्या तिघांना बेड्या, एक फरार

मालेगावमध्ये चरससारख्या अमली पदार्थ विकणाऱ्या तिघांना उपमहानिरीक्षकांच्या पथकाने बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून 1 लाख 44 हजार 300 रुपये किमतीचा चरससदृश अमली पदार्थ (481 ग्रॅम) जप्त केला आहे.

मालेगावमध्ये चरससारख्या अमली पदार्थाची विक्री; पोलिसांच्या तिघांना बेड्या, एक फरार
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 11:40 AM

नाशिकः मालेगावमध्ये चरससारख्या अमली पदार्थ विकणाऱ्या तिघांना उपमहानिरीक्षकांच्या पथकाने बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून 1 लाख 44 हजार 300 रुपये किमतीचा चरससदृश अमली पदार्थ (481 ग्रॅम) जप्त केला आहे.

अमली पदार्थ परवठा करणारे पंटर नेहमी तरुणांच्या शोधात असतात. त्यांना एकदा अमली पदार्थाचे व्यसन लागले की, त्यातून बाहेर पडणे अवघड होते. हेच हेरून ते उच्चभ्रू आणि धनाढ्य घरातल्या तरुणांना जाळ्यात ओढतात. मालेगावमध्ये ड्रग माफियाने हातपाय पसरल्याचे उघड झाल्याने नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मालेगाव शहरात कुत्ता गोळीसह मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री होते. हे जाळे नेमके कुठपर्यंत आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. त्या अंतर्गतच विशेष पथकाने गुरुवारी पहाटे जुना आग्रा रोडवर कारवाई केली. त्यात चरससारख्या अमली पदार्थ विकणाऱ्या मोहम्मद सईद फारुख कुरेशी, मोहम्मद अमीन समीउल्ला अन्नारी (दोघेही राहणार आखतराबाद) आणि रफिक मोहमद्दम याकूब (रा. कुंभारवाडा) या तिघांना बेड्या ठोकल्या. मात्र, यावेळी एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. तो उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याचे समजते. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बी. बी. थोरात यांनी सुरू केला आहे.

ड्रग माफिया रुबीना अटकेत

मुंबईच्या नार्को टेस्ट विभागाने नुकतीच एक मोठी कारवाई केली. गुजरातमधल्या मीरादातार येथे झोपडपट्ट्यांमधील अमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी त्यांनी छापे मारले. त्यात रुबीना हे नाव पुढे आले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तेव्हा ती ड्रग माफिया असल्याचे उघड झाले. तिचे पूर्ण नाव रुबीना नियाज शेख आहे. पोलिसांनी रुबीनाला बेड्या ठोकल्यात. मात्र, या टोळीचा म्होरक्या निलोफर सांडोले पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार झाला आहे. याप्रकरणी रुबीनाचा कसून चौकशी केली असता, तिच्या टोळीने मालेगावमध्ये हातपाय पसरल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता अमली पदार्थांच्या टोळीची चेन उद्धवस्त करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

रुबीनाचे उच्चभ्रू वस्तीत तीन बंगले

रुबीना राज्यभर ड्रग पुरवठा करायची. त्यासाठी तिने आपल्या हॅण्डलर्सचे जाळे तयार केले आहे. या व्यवसायातून कोट्यवधींची माया जमवली आहे. त्यातून मालेगावधल्या उच्चभ्रू वस्तीमध्ये तीन आलिशान बंगले खरेदी केले आहेत. सोबतच तिची इतरही मालमत्ता असल्याचे समजते. त्यात सायने शिवारात लाखोंची जमीन असल्याचे उघड झाले आहे.

ड्रग एमडीचा मुख्य व्यवसाय

रुबीना शेखचा मुख्य व्यवसाय हा ड्रग एमडीचा आहे. ती आपल्या पंटरमार्फत राज्यभरात ड्रगचा पुरवठा करते. मालेगाव शहरात कुत्ता गोळी व अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. हीच बाब हेरून तिने शहरात बस्तान बसवल्याचे समजते. तिच्या टोळीमधील पंटरचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

इतर बातम्याः

चर्चा तर होणारचः शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते संजय राऊत उद्यापासून नाशिक दौऱ्यावर

परमबीर सिंह बेनामी मालमत्ता प्रकरण; पुनमियाच्या जामिनावर गुरुवारी सुनावणी

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.