Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! ऐन दिवाळीत सख्ख्या तीन भावांचा शॉक लागून मृत्यू

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून पोलीस तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.

धक्कादायक! ऐन दिवाळीत सख्ख्या तीन भावांचा शॉक लागून मृत्यू
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 6:16 PM

जालना : ऐन दिवाळीत (Diwali) जालन्यामध्ये (Jalna) काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार समोर आला आहे. विद्युत शॉक लागून सख्ख्या तीन भावांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची घटना भोकरदन तालुक्यात पिंपळगाव पिंपळे इथं घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. (Three brothers died at the same time due to electric shock in jalna)

मिळालेल्या माहितीनुसार, तिघे भाऊ शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेले होते. शेतात जाताच पाणी सोडण्यासाठी तिघे विहिरीवर विद्युत मोटर चालू करण्यासाठी गेले असता शॉक लागला. यावेळी एकमेकांची मदत करण्यात तिघांचाही मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

या घटनेमध्ये ज्ञानेश्वर आप्पासाहेब जाधव 27वर्षे, रामेश्वर आप्पासाहेब जाधव 24 वर्षे आणि सुनिल आप्पासाहेब जाधव अशी मयत भावांची नावं आहे. ऐन दिवाळीत तिघांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे तर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. (Three brothers died at the same time due to electric shock in jalna)

शेतामध्ये तिघा भावांना शॉक लागताच त्यांचा मृत्यू झाला. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेईपर्यंत तिघांचेही प्राण गेल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. नेमका शॉक कसा लागला याचाही शोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून तिघा भावंडांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणात कुटुंबीय आणि स्थानिकांचीही चौकशी करत आहेत. तर घरातून शेतात गेलेली तरुण लेकरं परत कधीच घरी परतणार नाहीत या विचारांनी कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

इतर बातम्या –

शौचाल्याच्या टाकीचे झाकण उघडे, खेळण्यासाठी गेलेल्या चार वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

दुधाचा टँकर उलटून 50 फूट फरफटत, पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर थरार, एकाचा जागीच मृत्यू

(Three brothers died at the same time due to electric shock in jalna)

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.