नवी मुंबईत शिवसेनेला मोठा धक्का, 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर?
शिवसेनेला नवी मुंबई महानगरपालिकेत मोठा धक्का बसला आहे (Navi Mumbai Shivsena corporators). शिवसेनेचे 3 नगरसेवक सध्या भाजपच्या वाटेवर आहेत.

नवी मुंबई : शिवसेनेला नवी मुंबई महानगरपालिकेत मोठा धक्का बसला आहे (Navi Mumbai Shivsena corporators). शिवसेनेचे 3 नगरसेवक सध्या भाजपच्या वाटेवर आहेत. प्रशांत पाटील, सुवर्णा पाटील आणि कमलताई पाटील असं या तीन नगरसेवकांची नावं आहेत. हे तिघेही घणसोली विभागातील शिवसेना नगरसेवक आहेत. त्यांनी एका लोकार्पण सोहळ्याला थेट गणेश नाईक यांना आमंत्रण दिलं आहे. तसेच घणसोली विभागात यासाठी मोठी बॅनरबाजी देखील केल्याचं पाहायला मिळालं आहे.
शिवसेनेतील वाढत्या गटबाजीला कंटाळून संबंधित नगरसेवक पक्षांतराच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच (23 फेब्रुवारी) नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील भाजपचे चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या चारही नगरसेवकांचा पक्षप्रवेश झाल होता. यात माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, त्यांची पत्नी नगरसेविका राधा कुलकर्णी, संगीता वास्के आणि मुद्रिका गवळी यांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील भाजपच्या या चार नगरसेवकांनी राजीनामा दिला होता. या चारही नगरसेकांनी आपले राजीनामे महापालिका आयुक्त अण्णा मिसाळ यांच्याकडे सुपूर्द केले होते. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढच्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना भाजपला गळती लागल्याचे चित्र दिसत होतं. मात्र, आता शिवसेनेच्या 3 नगरसेवकांच्या हालचालींवरुन शिवसेनेचेही नगरसेवक भाजपच्या गळाला लागल्याचं दिसत आहे.
संबंधित बातम्या :
नवी मुंबईत भाजपला धक्का, राजीनामा दिलेले 4 नगरसेवक ‘मातोश्री’वर
Navi Mumbai Shivsena corporators