तुझ्यामुळे कोरोना होईल, तू हॉस्पिटलला जाऊ नको, बार्शीत वैद्यकीय कर्मचाऱ्याला मारहाण

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आरोग्य कर्मचारी (Villagers beaten Health worker) प्रचंड मेहनत घेत आहेत. मात्र, दुसरीकडे आरोग्य कर्मचाऱ्यांवरच हल्ला होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

तुझ्यामुळे कोरोना होईल, तू हॉस्पिटलला जाऊ नको, बार्शीत वैद्यकीय कर्मचाऱ्याला मारहाण
Follow us
| Updated on: May 01, 2020 | 5:01 PM

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आरोग्य कर्मचारी (Villagers beaten Health worker) प्रचंड मेहनत घेत आहेत. मात्र, दुसरीकडे आरोग्य कर्मचाऱ्यांवरच हल्ला होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सौंदरे गावात एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या कर्माचाऱ्याला दररोज रुग्णालयात कामासाठी जातो म्हणून तीन गावकऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत रुग्णालय कर्मचारी सुजित कुंभारे जखमी झाले आहेत. याप्रकरणी सुजित कुंभारे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे (Villagers beaten Health worker).

“रुग्णालयात कामासाठी का जातो? तुझ्याामुळे गावातील सर्वांना कोरोना होईल. तू रुग्णालयात कामाला जाऊ नको आणि गेलास तर रुग्णालयातच राहा, परत इकडे येऊ नको”, असं म्हणत सौंदरे गावाच्या एकाच कुटुंबातील तीन जणांनी मिळून सुजित कुंभारे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत कुंभारे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या बार्शीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सौंदरे गावाचे रहिवासी सुजित कुंभारे हे गावाजवळ असलेल्या बार्शीतल्या एका खासगी रुग्णालयाचे कर्मचारी आहेत. सुजित हे गेल्या 14 वर्षांपासून या रुग्णालयाच्या न्यूरो विभागात काम करतात. मात्र, गावातील एकाच कुटुंबातील तीन जाणांनी एकत्र येऊन सुजित कुंभारे यांना रुग्णालयात कामासाठी जातो म्हणून मारहाण केली.

दरम्यान, सोलापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. सोलापुरात कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यांनी शंभरी गाठली आहे. कोरोनाचे काल (30 एप्रिल) दिवसभरात 21 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 102 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 3 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना नियंत्रणात आणण्याचं मोठं आव्हान प्रशासनापुढे असताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर अशाप्रकारे हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान, आरोग्य कर्माचारी, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या :

पुण्यात शुक्रवार ठरला घातवार, 24 तासात सात रुग्ण दगावले, बळींचा आकडा शंभरीच्या उंबरठ्यावर

स्थलांतरित मजुरांना दिलासा, तेलंगणा ते झारखंड विशेष ट्रेन धावली

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.