AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहू महाराजांनी बांधलेलं राधानगरी धरण, 100 वर्षांनंतरही ना गळती, ना धोका

रत्नागिरी जिल्ह्यात फुटलेल्या धरणाने स्थानिकांच्या डोळ्यात ठेवलं ते केवळ पाणी आणि पाणीच. याच दुर्घटनेच्या अनुशंगाने राज्यातील इतर धरणांचा आढावा घेणं गरजेचं आहे. कोल्हापुरातील राधानगरीत शाहू महाराजांनी 100 वर्षांपूर्वी धरण बांधलं. पण आजही ते भक्कमपणे उभा आहे.

शाहू महाराजांनी बांधलेलं राधानगरी धरण, 100 वर्षांनंतरही ना गळती, ना धोका
Follow us
| Updated on: Jul 04, 2019 | 9:09 AM

कोल्हापूर : दूरदृष्टी काय असते हे आपल्याला राजर्षी शाहू महाराजांनी शिकवलंय. पण तरीही त्याकडे दुर्लक्ष होतं आणि दुर्घटना घडतात. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील तिवरे धरण फुटून अनेकांनी जीव गमावला, तर कित्येकांचे संसार धरणाच्या पाण्यात वाहून गेले. या धरणाने स्थानिकांच्या डोळ्यात ठेवलं ते केवळ पाणी आणि पाणीच. याच दुर्घटनेच्या अनुशंगाने राज्यातील इतर धरणांचा आढावा घेणं गरजेचं आहे. कोल्हापुरातील राधानगरीत शाहू महाराजांनी 100 वर्षांपूर्वी धरण बांधलं. पण आजही ते भक्कमपणे उभा आहे.

कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील लक्ष्मी तलाव म्हणजेच राधानगरी धरण. बरोबर 100 वर्षांपूर्वी कोल्हापूर शहराची तहान ओळखून राजर्षी शाहू महाराजांनी भोगावती नदीवर या धरणाची निर्मिती केली. देशात कोणत्याही धरणाला स्वयंचलीत दरवाजांची सुविधा नसेल असं तंत्र इथं वापरण्यात आलं. तब्बल 8 टीएमसी क्षमता असलेल्या धरणाच्या या भिंती आजही भक्कमपणे उभ्या आहेत. या धरणाचं बांधकाम हे दगडांमध्ये करण्यात आलंय. या विशिष्ट बांधकाम प्रकारावरुनच या धरणाचं बांधकाम किती भक्कम आहे याची प्रचिती येते. चुना आणि शिसे  यांचं मिश्रण करुन या धरणाची बांधणी केली. ती इतकी भक्कम आहे की 100 वर्षानंतरही धरण डामडौलात उभं आहे.

कसं आहे राधानगरी धरण?

राजर्षी शाहू महाराजांनी 1909 साली या धरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली

हे धरण बांधण्यासाठी महाराजांनी दगडी बांधकामाचा प्रकार निवडला

या धरणाची उंची 38.41 मीटर आहे, तर लांबी 1037 मीटर आहे

धरणातून पाण्याचा विसर्ग होण्यासाठी 7 स्वयंचलीत दरवाजे बसवले आहेत

धरण पूर्ण क्षमतेने भरताच यापैकी एक-एक दरवाजा उघडला जातो

ज्यावेळी राधानगरी धरण 100 टक्के भरेल, त्यावेळी याच दरवाजातून पाण्याचा विसर्ग होतो. अशा पद्धतीचं तंत्र अजून तरी देशातील कोणत्याही धरणावर बसवण्यात आलं नाही. आताच्या पिढीला देखील या धरणावर इतका विश्वास आहे की ते बिनधास्तपणे या धरणाच्या जवळ राहतात.

तिवरे धरणाची परिस्थिती कशामुळं झाली याची चौकशी होईलच. दोषींवर कारवाई होईल. पण ज्यांची घरं उद्धवस्त झाली त्यांचं नुकसान भरून निघण्यासारखं नाही. आज अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तरीही असे प्रकार घडतात. मात्र 100 वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी हे भक्कम वैभव उभा केलंय. त्यातील थोडं जरी ज्ञान घेतलं तर असे प्रकार पुन्हा महाराष्ट्रात घडणार नाहीत.

'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.