इलॉननं ट्विटर विकत घेताच ‘या’ बाई ढसाढसा का रडल्या?

एका रिपोर्टनुसार इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर ट्विटरच्या टॉप लॉयर विजया गाड्डे एका टीम मीटिंगमध्येच ढसाढसा रडल्या. यासोबतच मस्क यांनी आधीच्या काळात घेतलेल्या विविध निर्णयांवरही त्यांनी सडकून टीका केली काय आहे, हे संपूर्ण प्रकरण या लेखातून जाणून घेणार आहोत.

इलॉननं ट्विटर विकत घेताच ‘या’ बाई ढसाढसा का रडल्या?
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 8:59 PM

मुंबईः इलॉन मस्क (Elon Musk) यांची ट्विटर विकत घेण्याची ऑफर कंपनीने स्वीकारली आहे. लवकरच हा करार पूर्ण करण्यात येणार आहे. यानंतर ट्विटरची (Twitter) मालकी इलॉन मस्क या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीकडे जाणार आहे. परंतु यासह एक गोष्ट सध्या खूप चर्चेत आली आहे. एका रिपोर्ट्सनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या टॉप लॉयर विजया गाड्डे (Vijaya Gadde) यांना हे वृत्त समजताच एका मीटिंगमध्ये त्या भावूक होऊन रडू लागल्याचा दावा करण्यात येत आहे.

लिगल आणि पॉलिसी टीमसोबत झालेल्या बैठकीत विजया गाड्डे रडायला लागल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम मीटिंगमध्ये विजया गड्डे यांचे रडण्याच्या माहितीला दुजोरा मिळाला आहे. त्याचवेळी इलॉन मस्क यांनी विजया गाड्डे यांच्यावर एका निर्णयावरून निशाणा साधल्याचेही वृत्त आहे. हा निर्णय सेन्सॉरशिपशी निगडीत होता. ट्विटर विकत घेण्यापूर्वी मस्क यांनी व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटरच्या लॅपटॉपवरील विशेष स्टोरीच्या सेन्सॉरिंगबद्दल मस्कने विजया यांना टार्गेट केल्याची माहिती आहे. Vijaya Gadde, the top censorship advocate at Twitter who famously gaslit the world on Joe Rogan’s podcast and censored the Hunter Biden laptop story, is very upset about the @elonmusk takeover

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पॉडकास्ट होस्ट सागर एन्जेटी यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये सांगितले, की हंटर बायडेनची लॅपटॉप स्टोरी सेन्सॉर करणाऱ्या ट्विटरच्या वकील विजया गड्डे ह्या मस्क यांनी ट्वीटर ताब्यात घेतल्याने खुप दुखी झालेल्या आहेत. एन्जेटी यांच्या या ट्विटला प्रत्युत्तर देताना इलॉन मस्क यांनी एका आघाडीच्या वृत्तसंस्थेची बातमी प्रकाशित करताना सांगितले, की त्यांचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करणे अत्यंत चुकीचे होते.

कोण आहेत विजया गाड्डे?

48 वर्षीय विजया गाड्डे 2011 मध्ये ट्विटरमध्ये रुजू झाल्या आणि तेव्हापासून कंपनीच्या सिक्युरिटीचा एक भाग असून कायदेशीर समस्या आणि संवेदनशील प्रकरणे हाताळण्यासाठी त्या काम करीत आहेत. कंपनीच्या अनेक मोठ्या निर्णयांमागे त्यांचा हात असल्याचे मानले जाते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते बंद करण्यामागेही त्यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय राजकीय जाहिराती स्क्रॅप करण्यामागेही त्या प्रमुख भूमिकेत असतात.

विजया होताय ट्रोल

ट्रम्प आणि इलॉन मस्क यांचे समर्थक विजया गाड्डे यांना ट्विटरवर ट्रोल करत आहेत. इलॉन मस्क यांनी ट्विटर ४४ बिलियन डॉलर्समध्ये विकत घेतले आहे. त्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीतील 9.2 टक्के भागभांडवल खरेदी केले होते आणि नंतर कंपनीतील संपूर्ण स्टॉकसाठी 44 अब्ज डॉलर देऊ केले होते.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.