Aurangabad: अजिंठा लेणीचा 44 लाख रुपयांचा महसूल बुडाला, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका

पर्यटन नगरी औरंगाबादचे एसटी महामंडळाच्या संपामुळे प्रचंड नुकसान होत आहे. अजिंठा लेणी पाहण्यासाठी जगभरातून येणाऱ्या पर्यटकांची मोठी हेळसांड होत आहे. यामुळे

Aurangabad: अजिंठा लेणीचा 44 लाख रुपयांचा महसूल बुडाला, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका
औरंगाबादमध्ये एसटीच्या संपामुळे पर्यटन व्यवसायाला फटका
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 12:24 PM

औरंगाबादः एसटी महामंडळाच्या (ST Strike) कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जवळपास महिनाभरापासून राज्यभरातील बससेवा बंद आहे. त्यामुळे पर्यटनस्थळांना याचा मोठा फटका बसत आहे. कोरोनाचा  प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दिवाळीपूर्वी औरंगाबादमधील पर्यटन पुन्हा एकदा पूर्वपदावर येऊ लागले होते, मात्र एसटी संपामुळे पर्यटन (Tourism) व्यवसायाची मोठी अडचण झाली आहे. औरंगाबादमधील जगप्रसिद्ध अजिंठा लेणीची (Ajanta Caves) बस सेवा बंद आहे. यामुळे महामंडळाचा 44 लाखांचा महसूल बुडाला आहे. बस बंद असल्याने खासगी वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.

महिनाभरापासून पर्यटकांची हेळसांड

राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी महामंडळाचे राज्यभरातील कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपात सोयगाव आगाराचे कर्मचारी सहभागी झाल्याने 9 नोव्हेंबरपासून अजिंठा लेणीची बससेवा बंद पडली आहे. यामुळे लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे मोठे हाल झाले होते. पर्यटकांना बैलगाडीने किंवा पायी लेणीपर्यंत जावे लागत होते. पर्यटन विकासाच्या मागणीवरून 11 नोव्हेंबरला खासगी वाहनांना पर्यटकांनी ने-आण करण्याची परवानगी देण्यात आली होती. ती वाहनेदेखील कमी पडत असल्याने 15 नोव्हेंबरला पुन्हा 4 खासगी ट्रॅव्हल बसला परवानगी देण्यात आली. त्यानंतरही आणखी काही वाहनांना परवानगी देण्यात आली. त्यामुळे सध्या 17 वाहने पर्यटकांना सेवा देण्यासाठी लेणीत उपलब्ध आहेत.

लवकरच बससेवा सुरु होण्याच संकेत

अजिंठा लेणीत येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना अडचणी येत असल्याने तसेच यामुळे महसुलावरही मोठा परिणाम होत असल्याने या परिसरातील बससेवा लवकर सुरु करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. लेणीपासून सोयगाव आगाराला मिळणारा 22 दिवसांचा 44 लाख रुपये इतका महसूल बुडाला आहे. ही बससेवा बुधवारपासून सुरळीत होईल, असे संकेत सोयगाव आगारप्रमुखांनी दिले आहेत.

इतर बातम्या-

Weather Alert: मराठवाड्यासह राज्यावर पावसाचे ढग, दोन दिवस वातावरण ढगाळ, नंतर कडाक्याची थंडी!

हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा मनस्ताप कमी होणार, पनवेल ते गोरेगाव थेट लोकल सुरु

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.