Nashik| तरुणांना मिळणार मोफत निवासी वाईन प्रशिक्षण; काय आहे पात्रता, घ्या जाणून!

निवासी वाईन प्रशिक्षणाचा कालावधी साधारण एक महिना असेल. कोविडची लस घेणाऱ्यांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे.

Nashik| तरुणांना मिळणार मोफत निवासी वाईन प्रशिक्षण; काय आहे पात्रता, घ्या जाणून!
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 3:22 PM

नाशिकः एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक द्वारा पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत जिल्ह्यातील आदिवासी युवक व युवतींसाठी एक महिना मोफत निवासी वाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्या अनुषंगाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या नाशिक, निफाड, येवला, सिन्नर, इगतपुरी, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यातील युवक व युवतींनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन नाशिक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे, प्रकल्प अधिकारी संजय भामरे यांनी केले आहे.

ही आहे पात्रता..

निवासी वाईन प्रशिक्षणाचा कालावधी साधारण एक महिना असेल. कोविडची लस घेणाऱ्यांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता विज्ञान शाखेत 12 वी पास व वयोमर्यादा 18 ते 45 असणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणांतर्गत द्राक्षापासून वाईन तयार करण्याचे तांत्रिक व प्रात्याक्षिक प्रशिक्षण, महाराष्ट्राचे वाईन धोरण, वाईन उद्योगासाठी सहाय्यभूत शासनाच्या विविध योजना, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, बाजारपेठ सर्वेक्षण, प्रकल्प अहवाल, व्यवस्थापन व विक्री कौशल्य, डिजीटल मार्केटींग इत्यादी विषयांवर तज्ज्ञांच्या माधमातून मार्गदर्शन केले जाणार आहे.

ही कागदपत्रे आवश्यक…

निवासी वाईन प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक तरुण आणि तरुणींनी www.mced.co.in व https://mced.co.in/Training_Details/?id=780 या संकेतस्थळावर अर्ज सादर करावयाचा आहे. त्यासाठी विज्ञान शाखेत 12 वी पास असण्याचे पमाणपत्र, वयाचा दाखला, आधार कार्ड, अनुसूचित जमाती दाखला, कोविड लस घेतल्याचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र अर्ज भरताना सादर करणे आवश्यक आहे.

येथे साधा संपर्क…

या प्रशिक्षणाबाबत अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, यांचा भ्रमणध्वणी क्रमांक 7720075901 तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, 11 उद्योग भवन, शासकीय आय.टी.आय जवळ, त्र्यंबक रोड, नाशिक या ठिकाणी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही प्रकल्प अधिकारी संजय भामरे यांनी कळविले आहे.

वाईन प्रशिक्षण निवासी असेल. त्यासाठी उमेदवार विज्ञान शाखेत बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याची वयोमर्यादा ही 18 ते 45 वर्षांदरम्यान असावी. यातील पात्र उमेदवारांना प्रशिक्षणात द्राक्षापासून वाईन तयार करण्याचे तांत्रिक व प्रात्याक्षिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. – संजय भामरे, प्रकल्प अधिकारी

इतर बातम्याः

Nashik| ‘आजादी का अमृत महोत्सवा’निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात योगाभ्यासाचा संकल 

इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये, महागाईचा मुद्दा बाजूला अन् केवळ हिंदू-मुस्लीमवर चर्चा, भुजबळांचे वर्मावर बोट

बाळासाहेबांचं हिंदुत्व राष्ट्रीयत्वाला धरून, भागवतही म्हणालेले आमचा DNA एक, खासदार सावंतांकडून उजाळा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.