अॅड. अनिकेत निकमांचा युक्तीवाद अमान्य; टीआरपी घोटाळ्यातील आरोपींना जामीन नाहीच
टीआरपी घोटाळा प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या पाचही आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्यांना 16 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई : टीआरपी घोटाळा प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या पाचही आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्यांना 16 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नव्याने एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व आरोपींना समोरासमोर बसवून त्यांचे जबाब नोंदवून तपास करायचा असल्याने त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. (TRP Scam : All five accused were remanded in police custody till October 16)
चॅनेलचा टीआरपी घोटाळा मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणात सुरुवातीला चार लोकांना अटक करण्यात आली. विशाल भंडारी, बोपेल्ली राव, बॉक्स सिनेमाचे नारायण शर्मा आणि फक्त मराठी चॅनेलचे शिरीष शेट्टी यांना अटक करण्यात आली आहे. काल (सोमवारी) आणखी एका आरोपीला उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली. विनय त्रिपाठी असे आरोपीचे नाव असून तो हंसा रिसर्च प्रा. लि. या कंपनीचा माजी कर्मचारी आहे.
फक्त मराठी चॅनेलचे मालक शिरीष शेट्टी यांच्यासाठी अॅड. अनिकेत निकम हे बाजू मांडत आहेत. “याप्रकरणी ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांची चौकशी न करता पोलीस इतरांकडे चौकशी करत आहेत”, असा युक्तीवाद अनिकेत निकम यांनी कोर्टासमोर केला. परंतु तो अमान्य करत कोर्टाने पाचही आरोपींना जामीन नाकारला आणि त्यांना 16 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, टीआरपी घोटाळ्यात मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी अनेक मुद्यांवर तपास केला. काल (सोमवारी) हंसा रिसर्च कंपनीचे सीईओ प्रवीण निझार यांचा सुमारे सहा तास जबाब नोंदवला. त्यांच्याकडून बरोमीटरबाबत चौकशी करण्यात आली. तर हंसा कंपनीचे डेप्युटी मॅनेजर आणि तक्रारदार यांचा आज सविस्तर पुरवणी जबाब नोंदवण्यात आला. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी फक्त मराठी आणि फॉक्स चॅनेल या दोन चॅनेलची बँक खाती गोठवली. या चॅनेलच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये आहेत.
मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या चॅनेलवर टीआरपी घोटाळा केल्याचा आरोप आहे त्या चॅनेलचे मागील तीन वर्षाचे हिशेब तपासले जाणार आहेत. त्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटर नेमण्यासाठी पोलिसांनी टेंडर काढलं आहे. काही चॅनेलमध्ये जाहिरातीच्या माध्यमातून मनी लाँडरींग होत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
संबंधित बातम्या
TRP Scam : एका आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक, Republic TV च्या अधिकाऱ्यांची उद्या चौकशी
मुंबई पोलिसांनी हात आखडले, TRP घोटाळ्याचा तपास खास यंत्रणेकडे
फेक टीआरपी म्हणजे काय? असा चालतो आकड्यांचा खेळ
TRP SCAM: रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून सीईओ विकास खानचंदानींच्या चौकशीला सुरुवात
(TRP Scam : All five accused were remanded in police custody till October 16)