तुकाराम मुंढेंचा धडाका, 3 दिवसांत 22 बाजारातील तब्बल 2500 फेरीवाल्यांवर कारवाई

कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रीय म्हणून ख्याती असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (Nagpur Municipal commissioner Tukaram Mundhe) यांनी नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अवैध फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे. या कारवाईत तीन दिवसांत तब्बल 2500 फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढेंचा धडाका, 3 दिवसांत 22 बाजारातील तब्बल 2500 फेरीवाल्यांवर कारवाई
Follow us
| Updated on: Feb 03, 2020 | 3:47 PM

नागपूर : नागपुरातील फेरीवाले आता महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या रडारवर आहेत. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये बाजार भरत होते. इथला रस्त्यांचा परिसर फेरीवाल्यांनी व्यापला होता. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या फेरीवाल्यांवर कारवाईची मोहिम सुरु केली आहे (Nagpur Municipal commissioner Tukaram Mundhe). तीन दिवसांत 22 बाजारातील तब्बल 2500 फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरातील गजबजलेल्या भागातील रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे (Nagpur Municipal commissioner Tukaram Mundhe).

नागपुरात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कामाचा धडाका

कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रीय म्हणून ख्याती असलेले आयएएस अधिकारी यांनी 28 जानेवारी 2020 रोजी नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाची सुत्रे हाती घेत पहिल्याच दिवसापासून कामाला सुरुवात केली. त्यांनी पहिल्याच दिवशी नागपूर मनपाच्या लेखा विभागातील चार कर्मचाऱ्यांना कारणं दाखवा नोटीस बजावली. दुसऱ्या दिवशी सिमेंट रोड कंत्राटदारांना आणि मनपाच्या अभियंत्यालाही कारणं दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर मुंढेंनी ‘फेरीवाला हटाव’ मोहिम हाती घेतली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंनी तीन दिवसांत शहरातील 2500 फेरीवाल्यांवर कारवाई केली.

भाजीविक्री बंद झाल्यानं फेरीवाले संतापले

नागपूर शहरातील अनेक वस्त्यांमध्ये भाजीविक्रेते फेरीवाल्यांना मनपाने जागा दिली आहे. पण ती जागा सोडून रस्त्यावर अतिक्रमण करत फेरीवाले रस्त्यावर भाजी विकायचे. अशाच 2500 फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, वर्षानुवर्षे रस्त्यावर सुरु असलेली भाजीविक्री बंद झाल्यानं फेरीवाले संतापले आहेत.

कारवाईमुळे रस्ते मोकळे झाले : महापौर

नागपूर शहरात यापूर्वी महापौर संदीप जोशी यांनी अतिक्रमण हटवण्याची मोठी कारवाई केली होती. या कारवाईमुळे त्यांना धमकीही आली होती. तरीही शहरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई थांबली नाही. आता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अवैध फेरीवाल्यांवर कारवाईची मोहिम सुरु केली. या कारवाईमुळे शहरातील रस्ते मोकळे झाल्याचं नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितलं.

नागपूर शहरात अवैध फैरीवाल्यांमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी व्हायची. याशिवाय यामुळे अनेक अपघातही व्हायचे. शहरातील बरेचशे फुटपाथ तर फेरीवाल्यांच्या ताब्यातच होते. त्यातील काही रस्ते, फुटपाथ आता मोकळा श्वास घ्यायला लागले आहेत.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.