हजेरीसाठी काटेकोर असलेल्या तुकाराम मुंढेंचे आदेश, म्हणाले…..
नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय म्हणून ओळखले जातात (Tukaram Mundhe order 50 percent attendance). महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी वेळेवर आणि दररोज कामावर हजर राहावे, यासाठी ते आग्रही असतात.
नागपूर : नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय म्हणून ओळखले जातात (Tukaram Mundhe order 50 percent attendance). महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी वेळेवर आणि दररोज कामावर हजर राहावे, यासाठी ते आग्रही असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या 50 टक्केच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कामावर रुजू राहावे, असे निर्देश तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत (Tukaram Mundhe order 50 percent attendance).
जगभरात थैमान घालणारा कोरोना राज्यातही फोफावत चालला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सर्व सरकारी कार्यालयांवर 50 टक्के उपस्थितीचा आदेश दिला आहे. या आदेशानुसार कोणत्याही शासकीय कार्यालयातील 50 टक्के कर्मचारी आठवडाभर किंवा काही दिवस कामे करतील तर इतर सुट्टीवर जातील. त्यानंतर सुट्टीवर गेलेले 50 टक्के कर्मचारी कामावर रुजू होतील आणि इतर सुट्टीवर जातील, अशा आळीपाळीने काम करण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.
राज्य सरकारच्या या आदेशानंतर तुकाराम मुंढे यांनी परिपत्रक जारी करत महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना 50 टक्के उपस्थितीचे निर्देश दिले. तुकाराम मुंढें यांनी परिपत्रकात आणखी काही सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जे कर्मचारी सुट्टी घेऊ इच्छिता त्यांना तातडीने सुट्टी देण्याचे आदेश मुंढेंनी दिले.
महापालिका कर्मचाऱ्यांनी आपला पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक कार्यालयाला द्यावा. सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्यांनी घरीच राहावे. कार्यालयातून कधीही उपस्थित राहण्याच्या सुचना प्राप्त झाल्यास कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे अनिवार्य राहील, असंही मुंढे यांनी म्हटलं आहे. मात्र, हे निर्देश आरोग्य विभाग, वैद्यकिय शिक्षण, औषधी द्रव्ये विभाग आणि त्यांच्या प्राशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयांना लागू राहणार नाही, असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे.
संबंधित बातम्या :
लेटलतीफ कर्मचारीही सरळ, तुकाराम मुंढेंच्या शिस्तीने नागपूर मनपात 100 टक्के हजेरी
तुकाराम मुंढे यांचा धडाकेबाज एक महिना!.
तुकाराम मुंढेंचा दणका, उघड्यावर लघुशंका करणाऱ्याला स्वतः पालिका कार्यालयात नेलं
तुकाराम मुंढेंची डॅशिंग कारवाई, गँगस्टर आंबेकरचा अनधिकृत बंगला पाडला
मध्येच वाजलेल्या अधिकाऱ्याचा मोबाईल जप्त, नो जीन्स, क्लीन शेव्ह, तुकाराम मुंढेंची कडक शिस्त!
तुकाराम मुंढेंचा धडाका, 3 दिवसांत 22 बाजारातील तब्बल 2500 फेरीवाल्यांवर कारवाई