Jammu and Kashmir : कुलगाम भागात भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील येरीपोरा भागात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.

Jammu and Kashmir : कुलगाम भागात भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा
Follow us
| Updated on: Oct 10, 2020 | 10:41 AM

श्रीनगर : गेल्या काही दिवसांपासून काश्मीरच्या काही भागात सुरक्षाबलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सातत्याने चकमकी घडत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील येरीपोरा भागात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी सुरक्षाबलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार केलेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटवता आलेली नाही. तसेच ते कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते, याबाबतची माहितीदेखील अद्याप मिळालेली नाही. (Two unidentified terrorists killed in encounter between security forces and terrorists in Kulgam district)

पोलिस आणि सुरक्षाबलाच्या जवानांनी संयुक्तपणे मध्यरात्रीपासून कुलगाम भागात सर्च ऑपरेशन सुरु केले होते. त्यानंतर येरीपोरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यात दोन दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले. दहशतवाद्यांकडील एक एम 4 रायफल आणि पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. जे दोन दहशतवादी मारले गेले आहेत, त्यापैकी एकजण पाकिस्तानी असल्याची माहिती मिळाली आहे.

शोपियान भागात दोन दहशतवादी ठार

दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील शोपियान (Shopian) परिसरात सुरक्षा बलाचे (Security Forces) जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरु होत्या. त्यामधील सुगन भागात झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

07 ऑक्टोबरला सकाळी सुरक्षाबल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने एका विशेष सुचनेच्या आधारे सुगन भागात शोधमोहीम राबवली होती. त्यावेळी जवानांना दहशतवादी लपलेल्या जागेची माहिती मिळाली. त्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांचा अड्डा घेरला. बाहेर पोलीस आणि जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. जवानांनीदेखील त्यास प्रत्युत्तर दिले. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

पुलवामात दोन दहशतवादी ठार

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अंवतीपोरा भागात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले होते. सुरक्षा बलाच्या जवानांना माहिती मिळाली होती की, येथील सम्बोरा क्षेत्रात दहशतवादी लपले आहेत. त्यानंतर जवानांनी त्या भागात सर्च ऑपरेशन राबवले. याचदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. तेव्हा झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

संबंधित बातम्या

जम्मू आणि काश्मीर : शोपियान भागात जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमधल्या पंपोरमध्ये दहशतवादी हल्ला, दोन CRPF जवान शहीद, तिघे जखमी

(Two unidentified terrorists killed in encounter between security forces and terrorists in Kulgam district)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.