नव्या वर्षात धमाका, आणखी 10 ते 12 आमदार संपर्कात, शिंदेंच्या रत्नागिरी दौऱ्यापूर्वी उदय सामंत यांचा गौप्यस्फोट
लांजा येथील नगरपरिषदेतील अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावर उदय सामंत म्हणाले, काही नगरसेवक नाही तर अख्खी लांजा नगरपरिषदच शिंदे गटात गेली आहे.
रत्नागिरीः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या रत्नागिरी दौऱ्यापूर्वी उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. नवीन वर्षात आणखी नव्या राजकीय घडामोडी घडणार असून शिंदे गटाचं प्राबल्य वाढणार असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय. रत्नागिरीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उदय सामंत म्हणाले, ‘ 10 ते 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सरकार पडण्याचे दावे केले गेले. मात्र त्यात काहीही तथ्य नव्हतं. तेव्हा १७० हा आमचा मेजॉरीटी आकडा आहे. तेव्हाच मी दावा केला होता, आणखी १० ते १२ आमदार शिंदेंच्या संपर्कात आहेत. 180 ते 82 पर्यंत हा आकडा जाऊ शकतो. नव्या वर्षात नव्या राजकीय घडामोडी घडू शकतात.. धमाका पाच महिन्यांपूर्वीच झाला, त्याचे पडसाद नव्या वर्षात आणखी दिसू शकतात, असा दावा उदय सामंत यांनी केलाय.
लांजा येथील नगरपरिषदेतील अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावर उदय सामंत म्हणाले, काही नगरसेवक नाही तर अख्खी लांजा नगरपरिषदच शिंदे गटात गेली आहे.