मोठी बातमी नवी मुंबईतल्या मराठा आरक्षणाच्या बैठकीला दोन्ही राजे येणार!

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी आज मुंबई इथं बोलावलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीकडे उदयनराजे यांनी पाठ फिरवली आहे.

मोठी बातमी नवी मुंबईतल्या मराठा आरक्षणाच्या बैठकीला दोन्ही राजे येणार!
Follow us
| Updated on: Oct 07, 2020 | 1:16 PM

मुंबई : मराठा आरक्षणासाठी नवी मुंबईतील माथाडी भवनात आज होत असलेल्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. कारण उदयनराजे आणि संभाजी राजे पहिल्यांदाच मराठा आरक्षणच्या मुद्द्यावर एकत्र येणार होते. पण आजच्या या महत्त्वाच्या बैठकीकडे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे येणार नसल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी आज मुंबई इथं बोलावलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीकडे उदयनराजे यांनी पाठ फिरवली आहे. (Udayan Raje bhosle will not attend the meeting of Maratha reservation in Navi Mumbai)

इतकंच नाही तर लवकरच मराठ्यांच्या राजधानीतून मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक होणार असून साताऱ्यात होणाऱ्या या बैठकीचं स्वतः उदयनराजे नेतृत्व करणार असल्याची माहिती समोर येत आहे. खरंतर, मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थिगिती मिळाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशात राज्यात होणारी एमपीएससी परीक्षेला तूर्तास स्थगिती द्यावी आणि पोलीस भरतीदेखील थांबवावी अशी मागणी जोर धरत आहे.

या मागण्यांसाठी राज्यभरात मराठा समाजाच्या बैठका होत आहेत. बुधवारी नवी मुंबईत माथाडी समाजाची बैठक होणार आहे. या बेठकीला छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे उपस्थित राहणार होते. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या बैठकीकडे होते. पण आता उदयनराजे यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

उदयनराजे आणि संभाजीराजे बैठकीला उपस्थित राहतील – नरेंद्र पाटीलांचा दावा

दरम्यान, एकीकडे उदयनराजे भोसले हे बैठकीसाठी येणार नसल्याची माहिती असतानाच उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे हे दोघेही बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याचा दावा नरेंद्र पाटील यांनी केला आहे. त्यांनी टीव्ही 9 ला दिलेल्या माहितीनुसार, उदयनराजे भोसले सध्या पुण्यामध्ये आहेत. नवी मुंबईला पोहोचायला दीड तास लागतो. दोन्ही राजे उपस्थित असल्यावर बैठक सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर मराठा समाजासाठी दोन्ही राजे एकत्र येतील असा विश्वास नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे.

एकाच मंचावर हे दोघे उपस्थित राहणार असल्यानं नवी मुंबईमध्ये होणारी बैठक मराठा समाजाच्या दृष्टीने महत्वाची मानली जात होती. दोन्ही राजेंनी जर एकत्र निर्णय घेतला तर तो निर्णय मराठा समाजासाठी शेवटचा असतो. त्यामुळे मराठा आरक्षणच्या मुद्द्याला गती मिळेल असा दावा माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केला होता. पण आता उदयनराजेंच्या अनुपस्थितीतच बैठक पार पडणार असल्याने या काय निर्णय घेण्यात येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.

इतर बातम्या –

झाडींमधून येत होता बाळाच्या रडण्याचा आवाज, जवळ जाताच गावकरी हादरले

Weather Alert: राज्यात परतीच्या पावसाची हजेरी, या भागांत मुसळधार ते मध्यम सरी कोसळणार

(Udayan Raje bhosle will not attend the meeting of Maratha reservation in Navi Mumbai)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.