बंगळुरु: सर्च इंजिन गुगलवर भारतातील सर्वात वाईट भाषा(Ugliest Language in India) असं सर्च केल्यास जे उत्तर येत आहे. त्या उत्तरामुळे कन्नड भाषिक आक्रमक झाले आहेत. ते उत्तर कन्नड (Kannada) भाषा असं येत आहे. कन्नड ही भाषा 6 कोटी नागरिकांची बोली भाषा आहे. ज्या वेबसाईटमुळे वाद सुरु झाला ती वेबसाईट आता बंद आहे. मात्र, कन्नड भाषिकांनी गुगल माफी मागण्यास सांगितलं आहे. कन्नड भाषिकांनी गुगलकडे तक्रार करुन ही चूक दुरुस्त करण्यास सांगितलं आहे. debtconsolidationsquad.com या वेबसाईटवर तसा उल्लेख करण्यात आला होता. संबंधित वेबसाईट आता बंद आहे. (Ugliest Language in India controversy Kannada people angry against demand apology from Google Search engine)
कन्नड विकास प्राधिकरणाचे टीएस नागभरण यांनी आम्ही या प्रकरणी कायदेशी लढाई लढणार आहे. गुगलला कन्नड भाषेची बदनामी केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. कन्नड भाषेचं, कन्नड नागरिकांची जमीन, पाणी, भाषा आणि संस्कृती यावरुन हेटाळणी स्वीकारली जाणार नाही. हा कन्नड भाषेविरुद्ध नियोजित कट आहे. कन्नड भाषेच्या बदनामीविषयी छोटी गोष्ट देखील खपवून घेतली जाणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
जेव्हा गुगलवर भारतातील वाईट भाषा इंग्रजीमध्ये Ugliest Language in India असं सर्च केलं गेलं तेव्हा कन्नड भाषा असं दाखवतं होतं. त्या लिंकवर केल्यास debtconsolidationsquad.com या वेबसाईटवर ही माहिती असल्याचं समोर आलं होतं. मात्र, आता ती वेबसाईट बंद आहे. गुगलवर त्या वेबसाईटमुळे कन्नड भाषा असं उत्तर येत होतं. आता वेबसाईट बंद असल्यानं त्याबाबत माहिती मिळत नाही. मात्र, गुगलनं याबाबत दक्षता घेतली पाहिजे, असं कन्नड भाषा प्रेमींनी सांगितलं.
कन्नड भाषेबद्दलचा प्रकार समोर आल्यानंतर कन्नड भाषाप्रेमींनी संताप व्यक्त केला. सोशल मीडियावरुन गुगलनं माफी मागितली पाहिजे, अशी मागणी जोर धरु लागली आहे. थिंकनेक्सट आणि बंगळुरुमधील आयटी कंपनीनं चेंज ऑर्ग वर पिटीशन साईन केली आहे. गुगलनं तो सर्च रिझल्ट हटवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कन्नड भाषाविरोधकानं ही माहिती भरली असेल, त्यामुळे तसं दिसंत असावं, गुगल इंडियाकडून सांगण्यात आलं आहे.
Home to the great Vijayanagara Empire, #Kannada language has a rich heritage, a glorious legacy and a unique culture. One of the world’s oldest languages Kannada had great scholars who wrote epics much before Geoffrey Chaucer was born in the 14th century. Apologise @GoogleIndia. pic.twitter.com/Xie927D0mf
— P C Mohan (@PCMohanMP) June 3, 2021
संबंधित बातम्या:
…तर 2024 मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल : नाना पटोले
(Ugliest Language in India controversy Kannada people angry against demand apology from Google Search engine)