पीओपीच्या मूर्तीवरील बंदीला यंदा स्थगिती, गणेश मूर्तीकारांना केंद्राचा दिलासा

यंदाच्या वर्षी पीओपीच्या मूर्तीवरील बंदीला स्थगिती देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. (POP Ganpati Idol One year stayed)

पीओपीच्या मूर्तीवरील बंदीला यंदा स्थगिती, गणेश मूर्तीकारांना केंद्राचा दिलासा
Follow us
| Updated on: May 22, 2020 | 10:32 PM

मुंबई : महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला (POP Ganpati Idol One year stayed) जातो. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता ठिकठिकाणी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने यंदाच्या वर्षी पीओपीच्या मूर्तीवरील बंदीला स्थगिती देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानंतर, केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने देशभरात पीओपी मूर्तीवर बंदी घातली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मूर्तीकारांना शाडूची माती मिळणे कठीण झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सव समन्वय समितीने यंदाच्या वर्षाकरिता शाडू माती ऐवजी पीओपीची मूर्ती करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली होती. गणेशोत्सव समन्वय समितीची ही मागणी मान्य करत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पीओपी मूर्तीबंदीला एका वर्षांची स्थगिती दिली आहे.

गणेशमूर्तीसाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घालण्याच्या निर्णय एका वर्षासाठी स्थगित केला आहे. सध्या अनेक मूर्तिकारांच्या मूर्ती बनवून तयार आहेत. त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील मूर्तीकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.  तसेच अनेक मूर्तीकार आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने दिलेल्या निवेदनानुसार प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या सहकार्याबद्द्दल त्यांचे जाहीर आभार, असे या समितीने म्हटलं आहे.

त्याशिवाय सर्व मूर्तिकारांचे कुठलेही नुकसान होऊ नये यासाठी समिती कटिबद्ध आहे. यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा करावा. त्यानुसार मंडळे, कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. गणेशोत्सवादरम्यान भाविक तसेच आपल्या कार्यकर्त्यांची काळजी घ्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे, असेही या समितीने म्हटलं (POP Ganpati Idol One year stayed) आहे.

संबंधित बातम्या : 

तोळ्याने विकणाऱ्यावर किलोने विकण्याची वेळ, लॉकडाऊनमुळे सोनार बनला कांदा व्यापारी

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात लालपरी रस्त्यावर, नॉन रेड झोनमध्ये एसटी वाहतूक सुरु

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.