केंद्रीय मंत्री स्मृती इराणींकडून आईचा खास फोटो शेअर, लोक म्हणाले, आजचा दिवस भारी!

स्मृती इराणी यांनी त्यांच्या आईचा गोड फोटो इन्स्टाग्रावर शेअर केला. हा फोटो लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींकडून आईचा खास फोटो शेअर, लोक म्हणाले, आजचा दिवस भारी!
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 8:30 PM

नवी दिल्लीकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोशल मीडियावर फार अ‌ॅक्टिव्ह असतात. दिवसभरातले अपडेट ते आपल्या फॉलोवर्सला सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असतात. आज (रविवार) स्मृती इराणी यांनी त्यांच्या आईचा गोड फोटो इन्स्टाग्रावर शेअर केला. हा फोटो लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. (Union Minister Smriti irani Share pic of her Strongest mummy)

स्मृती इराणी यांनी त्यांच्या आईचा शेअर केलेला फोटो चांगलाच व्हायरल होतोय. त्याला कारणंही तसंच आहे, स्मृती इराणी यांनी त्या गोड फोटोला दिलेलं मजेशीर क‌ॅप्शन. आई शिवानी यांचा बागेतील एक फोटो पोस्ट करत ‘सबसे मजबूत मम्मी’, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. स्मृती इराणी यांनी आपल्या पोस्टमध्ये #mymommystrongest असं म्हटलं आहे. हाच फोटो आणि कॅप्शन लोकांना फार आवडलं आहे.

याअगोदर स्मृती इराणींची एक पोस्ट लोकांना खूप आवडली होती. 2020 वर्षातील हा शेवटचा महिना सुरु आहे. लोक आता अशीच आशा करत आहेत की लवकरात लवकर हे वर्ष संपून जायला हवं, असं म्हणत स्मृती इराणी यांनी देशवासियांना खास शब्दात नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

डिसेंबर महिना जसा सुरु झाला तसं लोकांनी हे वर्ष संपलं असं जाहीर करुन नवीन वर्षाच्या तयारीला सुरुवात केली. अतिउत्साही लोकांच्या आनंदावर स्मृती इराणी यांनी मजेदार पद्धतीने विरजण टाकलं. एक मिम्स शेअर करत त्यांनी एक महिना बाकी असताना नवीन वर्षाचं स्वागत करणाऱ्या लोकांना चिमटा काढला.

शेअर केलेल्या मिम्समध्ये स्मृती इराणी म्हणाल्या, ते सगळे स्मार्ट लोक जे नोव्हेंबरपासूनच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत त्यांनी विसरु नये की आणखी डिसेंबर महिना जायचा आहे. लक्षात ठेवा कोंबड्यांची आकडेमोड तोपर्यंत करायची नाही जोपर्यंत ते अंड्याच्या बाहेर येणार नाही”… स्मृती इराणी यांचं हे मिम्स खूपच व्हायरल झालं होतं. स्मृती यांच्यानंतर अनेक जणांनी हे मिम्स शेअर केलं.

(Union Minister Smriti irani Share pic of her Strongest mummy)

संबंधित बातम्या

एक नेता ‘टंच माल’, तर दुसरा ‘आयटम’ म्हणतोय, गांधी कुटुंब आता गप्प का? : स्मृती इराणी

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.