उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहाद विरोधातील कठोर कायद्याला राज्यपालांची मंजुरी

उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहाद विरोधातील कायदा अधिकृतपणे लागू करण्यात आला आहे (UP Governor Anandiben Patel approves bill against love jihad).

उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहाद विरोधातील कठोर कायद्याला राज्यपालांची मंजुरी
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 3:18 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहाद विरोधातील कायदा अधिकृतपणे लागू करण्यात आला आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळानंतर राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी आज (28 नोव्हेंबक) ‘बेकायदेशीर धर्मांतरण अध्यादेश 2020’ या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये अधिकृतपणे लव्ह जिहाद विरोधातील कायदा मंजूर झाला आहे (UP Governor Anandiben Patel approves bill against love jihad).

उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाने 24 नोव्हेंबर रोजी लव्ह जिहाद विरोधातील कायद्याला मंजुरी दिली होती. त्यानंतर राज्यपालांकडे याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला होता. आता राज्यपालांनी देखील मंजुरी दिल्यानंतर लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशमध्ये लागू झाला आहे.

या नव्या कायद्यानुसार लग्नासाठी खोटं बोलून, छळ करुन, प्रलोभन दाखवून किंवा दबाव टाकून धर्मांतरण केलं तर 10 वर्ष कारावस आणि दंड अशा प्रकारची शिक्षा नमूद करण्यात आली आहे (UP Governor Anandiben Patel approves bill against love jihad).

या कायद्याचं उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीस कमीत कमी पाच वर्षांचा कारावास आणि 15 हजाराचा दंड भरावा लागेल. त्याचबरोबर अल्पवयीन मुलगी, अनुसूचित जाती किंवा जमातीच्या महिलेसोबत जबरदस्ती धर्मांतर करण्यासारख्या घटना घडल्यास तीन ते दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि 25 हजार दंड असेल. याशिवाय सामूहिक धर्म परिवर्तन सारख्या घटना आढळल्यास 10 वर्ष कारावास आणि 50 हजार रुपये दंड असेल.

उत्तर प्रदेश सरकारच्या या कायद्यानुसार आता आंतरधर्मीय विवाहासाठी 2 महिन्यांची नोटीस द्यावी लागणार आहे. तसेच जिल्हा दंडाधिकाऱ्यांची परवानगी देखील घ्यावी लागणार आहे. जर कोणत्याही तरुणाने आपलं नाव लपवून लग्न केलं तर त्याला 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी 24 नोव्हेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाने लव्ह जिहाद विरोधात कायदा लागू करण्याबाबत निर्णय घेतल्याची माहिती दिली होती. त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील या कायद्याबाबत याआधी माहिती दिली होती.

जौनपूरच्या मल्हनी विधानसभा मतदारसंघात एका जनसभेला संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी याबाबतची घोषणा केली होती. “आम्ही लव्ह जिहाद खपवून घेणार नाही. लव्ह जिहाद रोखण्यासाठी लवकरच प्रभावी आणि कठोर कायदा आणू. खोट्या नावाने आणि वेश बदलून मुलींची होणारी फसवणूक आम्ही थांबवल्याशिवाय राहणार नाही”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले होते. “लव्ह-जिहाद जर सुरूच ठेवलं तर तुमचं रामनाम सत्य झालंच म्हणून समजा”, असा इशाराही योगींनी भरसभेतून दिला.

संबंधित बातम्या :

योगी सरकारकडून लव जिहादविरोधात अध्यादेश जारी, दोषींना 10 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.