UPSC CSE 2023 Notification: UPSC नागरी सेवा परीक्षेची तारीख जाहीर; वाचा सविस्तर…
UPSC CSE 2023 Notification: UPSC कडून त्यांच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये नागरी सेवांव्यतिरिक्त, (Civil service) अनेक भरती परीक्षांच्या तारखा (Exams Time Table), अधिसूचना आणि अर्जाची अंतिम मुदत याबाबतही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यासाठीच जाणून घ्या तुम्ही नागरी सेवा परीक्षेच्या (Civil Service Examination) महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक.
UPSC Civil Services Exam 2023 Notification: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) 2023 पर्यंतच्या वर्षात UPSC कडून नागरी सेवा प्राथमिक परीक्षा (Civil Service Preliminary Examination) जाहीर करणार आहे. UPSC कडून आगामी भरती परीक्षेचे नियोजनही (Recruitment Exam Planning) जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेची तुम्हाला माहिती हवी असले तर UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वरुन डाउनलोडही करू शकता. लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार UPSC कडून 28 मे रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे.
त्या परीक्षेची सूचना 1 फेब्रुवारी 2023 रोजी अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांची प्राथमिक परीक्षा (UPSC Civil Services Prelims Exam 2023) अर्जासाठी 20 दिवसांचा अवधी दिला जाणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवार 28 मे पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत मात्र, परीक्षेच्या तारखा परिस्थितीनुसार बदलल्या जाऊ शकतात असेही सांगण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून परीक्षार्थीकडे पदवी असणे गरजेचे आहे. अंतिम वर्षाचे विद्यार्थी, जे निकालाच्या प्रतीक्षेत आहेत, ते विद्यार्थीही सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स परीक्षेचा फॉर्म भरू शकतात. मुख्य परीक्षेच्या वेळी उमेदवारांना त्यांच्या उत्तीर्ण असल्याचा निकाल दाखवावा लागणार आहे.
उमेदवाराकडे व्यावसायिक किंवा तांत्रिक पात्रतेचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तर एमबीबीएस अंतिम वर्षाचे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थीही इंटर्नशिपशिवाय प्रिलिम परीक्षेला बसू शकतात मात्र मुख्य परीक्षेच्या वेळी इंटर्नशिपचा पुरावा दाखवणे आवश्यक असणार आहे.
परीक्षेसाठी लागणारी वयोमर्यादा
सर्वसाधारण – 32 वर्षे ओबीसी – 35 वर्षे SC किंवा ST – 37 वर्षे अपंग व्यक्ती – 35 वर्षे माजी कर्मचारी – 37 वर्षे EWS श्रेणीतील अपंग व्यक्ती – 42 वर्षे
परीक्षेचे वेळापत्रक
लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये 2023 मधील परीक्षा, त्याची अधिसूचना तारीख, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि परीक्षेची तारीख यांचा समावेश त्यामध्ये केला आहे. UPSC इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस (IES) ची पूर्व परीक्षा 19 फेब्रुवारी रोजी आणि संयुक्त भू-शास्त्रज्ञ (मुख्य) परीक्षा 24 जून रोजी होणार आहे.
NDA आणि NA च्या ही परीक्षा
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) आणि नौदल अकादमी (NA) च्या परीक्षाही 16 एप्रिल रोजी होणार आहेत. प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला बसावे लागणार आहे. नागरी सेवा मुख्य परीक्षा 2023 ही परीक्षा 15 सप्टेंबर रोजी होणार आहे, परीक्षा 5 दिवस चालणार असून भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा 2023 मध्ये 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे आणि ही परीक्षा 10 दिवस चालणार आहे.