अनेक जण केसात कोंडा (dandruff) होण्याच्या समस्येने चिंताग्रस्त असतात. चुकीची जीवनपध्दती, केसांची निगा न राखणे, (hair care) तणाव आदी विविध कारणांमुळे केसांमध्ये कोंडा निर्माण होत असतो. याशिवाय कोंड्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होण्याचा धोका असतो. डोक्यावर जास्त कोंडा हा वेळप्रसंगी तीव्र खाज निर्माण करु शकतो. कोंडा तणावाचे कारण देखील बनतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण महागड्या उत्पादनांऐवजी घरगुती उपायांचा अवलंब करतात. आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या वापरल्यास कोंड्याच्या समस्येपासून आपण दूर होउ शकतो. यामध्ये ऑलिव्ह ऑइलचा (olive oil) प्रामुख्याने समावेश होतो.
अनेक वेळा हिवाळ्यात त्वचा कोरडी पडत असते. त्यामुळे खाज आणि वळखण आदी समस्या निर्माण होत असतात. अशा परिस्थितीत, केस व डोक्यावरील ओलावा टिकवून ठेवणे आवश्यक असते. यासाठी ऑलिव्हचा चांगल्या पध्दतीने वापर होउ शकतो. यातून ओलावा टिकण्यास मदत होते. शिवाय कोंड्याची समस्या दूर होते.
कोंडा दूर करण्यासाठी लिंबूदेखील प्रभावी माध्यम आहे. लिंबूमध्ये असलेले गुणधर्म बुरशीजन्य संसर्ग दूर करण्यास मदत करतात. शिवाय केसांच्या काळजीसाठी लिंबूचा समावेश करणे चांगले मानले जाते. लिंबू ऑलिव्ह ऑइलसोबत लावण्यासाठी एका भांड्यात तेलात लिंबाचा रस मिसळा. ते टाळूवर लावा आणि सुमारे 45 मिनिटे लावून ठेवा त्यानंतर स्वच्छ धून घ्यावे. यामुळे केस मजबूत होतात.
कोरडेपणा आणि कोंडा दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल आणि व्हिनेगर एकत्र मिसळून केसांना लावा. व्हिनेगरमध्ये असलेले अँटी- बॅक्टेरियल गुणधर्म केसांमधील कोंडा दूर करतात आणि त्यांना निरोगी बनवतात. एका भांड्यात ऑलिव्ह ऑईल घ्या आणि त्यात 3 चमचे व्हिनेगर टाका. हे मिश्रण डोक्यावर पाच मिनिटे लावा आणि नंतर स्वच्छ धुवा. या पद्धतीमुळे केसांमधला कोंडा तर कमी होईलच शिवाय केसगळतीही कमी होईल.
अंड्यातील प्रोटीनमुळे केस मजबूत होतात. यासाठी अंड्याला फेटून त्यात थोडे ऑलिव्ह ऑईल टाका. हा मास्क टाळूवर चांगला लावा आणि त्यानंतर शॅम्पूने केस धुवा. यामुळे केसगळती तर कमी होतेच, शिवाय केसांना चांगली चमकही निर्माण होते.
इतर बातम्या-