कृषी योजनांच्या माहितीसाठी आता व्हॉटस्ॲप आणि ब्लॉगचा वापर : कृषिमंत्री दादाजी भुसे

कृषी विभागाच्या विविध योजनांशी माहिती तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचे काम सुरु असून विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी आता व्हाटसॲप आणि ब्लॉग या माध्यमांचा वापर करण्यात येत असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

कृषी योजनांच्या माहितीसाठी आता व्हॉटस्ॲप आणि ब्लॉगचा वापर : कृषिमंत्री दादाजी भुसे
Follow us
| Updated on: Nov 14, 2020 | 12:41 PM

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या विविध योजनांशी माहिती तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचे काम सुरु असून विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी आता व्हाटसॲप आणि ब्लॉग या माध्यमांचा वापर करण्यात येत असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. (Use WhatsApp and blog for information agricultural schemes Agriculture minister Dadaji bhuse)

राज्यात सुमारे 9 कोटी 37 लाख मोबाईलधारक असल्याची बाब लक्षात घेवून कृषी विस्तार कार्यामध्ये ह्या बाबींचा फायदा होवू शकतो हे लक्षात घेऊन व्हॉटसॲपद्वारे कृषी विषयक योजना व अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत परिणामकारक माहिती मिळावी म्हणून ऑटो रिप्लायची सुविधा तयार करण्यात आली आहे.

मातीत राबविणाऱ्या शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता ब्लॉग आणि व्हाटस्ॲपचा वापर करण्यात येत आहे.

मोबाईलवरून 80105 50870 या व्हाटस्ॲप क्रमांकावर ‘नमस्कार’ किंवा ‘हॅलो’ शब्द टाईप करून पाठविणाऱ्या व्यक्तीस स्वागत संदेश प्राप्त होतो. ज्यामध्ये कृषी विभागाच्या प्रचलित योजनांबाबत संक्षिप्त शब्द (की वर्डस् ) दिले आहेत. ते टाईप करून या व्हाटस्ॲप क्रमांकावर पाठवल्यावर शेतकऱ्याला हव्या त्या योजनेची माहिती मिळते.

सध्या या उपक्रमात कृषी विभागाच्या जवळपास २७ योजनांचा समावेश केला असून त्यात कृषी विभाग व जिल्हा परिषद यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचाही समावेश करून त्यांची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.

विभागामार्फत योजनांच्या अद्ययावत माहितीसाठी krushi-vibhag.blogspot.com हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे कृषी योजनेची व्याप्ती, लाभार्थी, निकष अनुदान व अर्ज कुठे करावा याबाबत माहिती देण्यात आली आहे.

(Use WhatsApp and blog for information agricultural schemes Agriculture minister Dadaji bhuse)

संबंधित बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत आर्थिक मदत देऊ, दादा भुसे यांचे आश्वासन

कृषीमंत्रीपद सोडण्यास दादा भुसे तयार!, पण शिवसेना खडसेंसाठी कृषी खातं सोडणार?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.