Nainital Rain Weather Update : नैनितालमध्ये पावसाचा कहर, नाशिकचे 27 पर्यटक अडकले!
गेल्या 24 तासांपासून उत्तराखंड नैनीतालमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे नैनी तलावाच्या पाण्याच्या पातळीने इतिहासातले सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. असं असतानाच नाशिकमधून नैनीतालला गेलेल्या पर्यटकांना पावसाचा फटका बसलाय. नाशिकचे 27 पर्यटक नैतितालमध्ये अडकले आहेत.
नाशिक : गेल्या 24 तासांपासून उत्तराखंड नैनीतालमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे नैनी तलावाच्या पाण्याच्या पातळीने इतिहासातले सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. असं असतानाच नाशिकमधून नैनीतालला गेलेल्या पर्यटकांना पावसाचा फटका बसलाय. नाशिकचे 27 पर्यटक नैतितालमध्ये अडकले आहेत. नैनीतालमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तेथील अनेक रस्ते बंद आहेत. परिणामी पर्यटकांना तिथून निघणं जिकीरीचं झालं आहे.
नाशिकच्या कलेक्टरांनी फोन फिरवला, नैनिताल प्रशासनाची लगोलग पावलं!
नाशिकचे 27 यात्रेकरु नैनितालला गेले होते. पण गेल्या 30 तासांपासून नैनितालमध्ये जोरदार पाऊस असल्याने देशभरातले पर्यटक अडकून पडले आहेत. नाशिकचे पर्यटकही यामध्ये आहेत. त्यांनी नैनितालमधील भीषण परिस्थितीचा ‘आँखो देखा हाल’ नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घातला.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी लगोलग नैनिताल प्रशासनाशी संपर्क साधला. यानंतर अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित स्थळी नेण्याची नैनिताल प्रशासनानने व्यवस्था केली. पर्यटकांची काळजी घेऊ, त्यांना लागेल ती मदत करु, असं नैनिताल प्रशासनाने नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना आश्वस्त केलं.
नैनितालमध्ये पाणीच पाणी चोहीकडे
आतापर्यंत नैनीतालमध्ये 24 तासांत सुमारे 500 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे, नैनी तलावाचे पाणी मंगळवारी सकाळी तल्लीतालमध्ये असलेली वेस पार करून रोडवेज बसस्थानकासह डीएम कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोहोचले, जिथून आजूबाजूच्या दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.
#WATCH | Uttarakhand: Nainital Lake overflows and floods the streets in Nainital & enters building and houses here. The region is receiving incessant heavy rainfall. pic.twitter.com/G2TLfNqo21
— ANI (@ANI) October 19, 2021
नैनितालमध्ये हजारो पर्यटकमध्ये अडकले
नैनीतालमधल्या पर्यटकांना रस्त्याने प्रवास करता येत नाहीय, कारण पावसाच्या कहराने नानितालचा इतर भागाशी संपर्क तुटलाय. भूस्खलनामुळे, ढिगाऱ्यांमुळे काळढुंगी, हळदवानी, भवाळीकडे जाणारे सर्व रस्ते बंद आहेत. नैनीतालला येणारे पर्यटकही मुसळधार पावसामुळे त्रासले आहेत. नैनीतालला भेट देण्यासाठी आलेले पर्यटक अचानक आलेल्या आपत्तीमुळे अडचणीत आले आहेत.
सर्व पर्यटकांना हॉटेलमध्ये राहण्यावाचून काहीही पर्याय नाहीय. यावेळी काही पर्यटक रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत. त्यांच्याशी टीव्ही 9 भारतवर्षने बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितलं, आम्ही जर असंच हॉटेलमध्ये राहिलो तर पुढच्या काही दिवसांचं भाडं हॉटेलमालक आमच्याकडून घेतील. त्यांनी आमची मजबूरी ओळखलीय. आमच्याकडून ज्यादा पैसे वसूल करण्याची शक्यता असल्याने कमी पैशातली हॉटेल आम्ही शोधत आहोत.
(Uttarakhand Nainital Rain Weather update Maharashtra nashik 27 Tourists stuck)
हे ही वाचा :
पुण्यातील उच्चशिक्षित कुटुंबात वाद, शिक्षणासाठी पैसे मागितल्याने बायकोला विहिरीत ढकललं
Petrol Diesel Price Today : पेट्रोलच्या दरात सलग दहाव्या दिवशी मोठी वाढ, जाणून घ्या आजचा दर!