condom addiction: कंडोममधून घेतायेत वाफ, पितायेत पाणी, तरुणांमध्ये वाढत चाललाय नशेचा नवा ट्रेंड, काय आहे कारण?
गेलया काही दिवसांपासून अचानक वाढलेल्या कंडोमच्या विक्रीमुळे दुकानदारही आश्चर्यचकित होते. त्यांनाही ही विक्री अचानक का वाढते आहे, याचे कारण कळत नव्हते. एका दुकानदाराने तर याबाबत खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणाकडे विचारणाही केली होती. मात्र त्यावर तरुणाने उत्तर देण्याचे टाळले.
कोलकाता- तरुणांमध्ये नशा (addiction)ण्यासाठी नवा ट्रेंड दिसतो आहे. हा ट्रेंड धक्कादायक आहे. तरुण नशा करण्यासाठी कंडोमचा (condom) उपयोग करत असल्याचे समोर आले आहे. पश्चिम बंगालच्या (west bangal)दुर्गापूर परिसरात कंडोमची नशा करणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ होतोना दिसते आहे. यामुळे तपास अधिकारी आणि यंत्रणाही आश्चर्यचकित झाल्या आहेत. कंडोमच्या नशेची सवय तरुणांना लागू लागली आहे, ही चिंताजनक बाब आहे. कंडोमची मागणी नशेसाठी वाढल्याने, या परिसरातील दुकानांमध्ये कंडोमची कमतरता भासू लागली आहे. नशेसाठी तरुणांमध्ये फ्लेवर्ड कंडोमची मागणी वाढू लागल्याने यंत्रणा चिंतेत आहे. दुर्गापूर सिटी सेंटर, बिधान नगर, बेनाचिती आणि मुचिपारा परिसरात फ्लेवर्ड कंडोम दुकानांत नावालाही शिल्लक राहिलेले नाहीत.
Flavoured Condoms – The New High!
हे सुद्धा वाचाFlavoured Condoms contain aromatic compounds. It breaks down to form alcohol. It is addictive. In addition the aromatic molecules may also cause high like sniffing of dendrite ( Inhalant abuse)https://t.co/GlfRRGCI2R
— Dr Jhunu Mukherjee, MD ( Psy) Eastern Railway (@JhunuDr) July 23, 2022
;
दुकानदारांनाही कळेना
गेलया काही दिवसांपासून अचानक वाढलेल्या कंडोमच्या विक्रीमुळे दुकानदारही आश्चर्यचकित होते. त्यांनाही ही विक्री अचानक का वाढते आहे, याचे कारण कळत नव्हते. एका दुकानदाराने तर याबाबत खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणाकडे विचारणाही केली होती. मात्र त्यावर तरुणाने उत्तर देण्याचे टाळले. गेल्या काहीदिवसांपासून तरुण मोठ्या संख्येने कंडोम खरेदी करत होते.
कंडोमची घेतात वाफ
दुकानदारांनी सांगितले की नशा करणारे तरुण या कंडोमचा उपयोग वाफ घेण्यासाठी करतात. अनेक जण इतर नशा करण्याऐवजी आता कंडोमची वाफ घएऊ लागले असल्याचीही माहिती आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने याबाबतचे एक संशोधन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार कंडोममध्ये एरोमॅटिक कम्पाऊंड असतात, हे कम्पाऊंड विरघळल्यानंतर त्याचे रुपांतर अल्कोहोलमध्ये होते. त्यामुळे त्याचे व्यसन लागण्याची शक्यता असते. नेमका हाच प्रकार सध्या प. बंगालात घडताना दिसतो आहे.
कंडोम उकळून पितायेत पाणी
याच जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, जर कंडोमला बराच काळ पाण्यात उकळत ठेवले तर त्याच्यातील अल्कोहोल असणारे द्रव्य हे पाण्यात मिसळते. हे नशा करणारे तरुण अशाच प्रकारे कंडोम उकळून, त्याची वाफ घेत असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तर हे कंडोम उकळलेले पाणीही काही तरुण नशा करण्यासाठी पित असल्याची माहिती आहे.