वसई-विरार, नालासोपाऱ्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, एकाच आठवड्यात 112 रुग्णांची वाढ
वसई-विरार आणि नालासोपाऱ्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग (Vasai-Virar Corona Update) वाढत चालला आहे.
पालघर : वसई-विरार आणि नालासोपाऱ्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग (Vasai-Virar Corona Update) वाढत चालला आहे. विशेष म्हणजे या आठवड्यात वसई-विरार आणि नालासोपाऱ्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत एकूण 112 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे वसई-विरार, नालासोपाऱ्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 318 वर पोहोचला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे (Vasai-Virar Corona Update).
वसई-विरार आणि नालासोपाऱ्यात 19 मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली. या भागात पाचव्या आठवड्यात 51 रुग्णांची वाढ झाली होती. तर आठव्या आठवड्यात 56 रुग्ण आढळले. मात्र, 9 व्या आठवड्यात दुप्पट रुग्ण आढळले आहेत. 9 व्या आठवड्यात तब्बल 112 रुग्णांची वाढ झाली.
वसई-विरार, नालासोपाऱ्यातील कोरोना रुग्णांची संख्या 318 वर पोहोचली आहे. यापैकी 163 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 142 रुग्णांवर उपचार सुरु आहे.
वसई, विरार, नालासोपारा क्षेत्रात 31 हॉटस्पॉट झोन झाले असून 30 वार्डात हे विभागलेले आहेत. यामध्ये वसई पश्चिम, वसई गाव, नालासोपारा पूर्व, विरार पश्चिम भागात कोरोना रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे. वसई पश्चिम आनंद नगर, साई नगर, ओम नगर, विना नगर, वसई गाव पापडी, गास, वसई पूर्व एव्हरशाईन, एव्हरशाईन सेक्टर 06, वसंत नगरी, नालासोपारा पूर्व आचोले, तुलिंज, भारत पेंढारी नगर (डॉन लेन), बु-हान नगर, सेन्ट्रलपार्क, प्रगती नगर, रहमत नगर, धणीवबाग, नालासोपारा पश्चिम निलेमोरे गाव, विरार पूर्व जगन्नाथ नगर, फुलपाडा, नारंगी गणपती मंदिर परिसर, विरार पश्चिम गोकुळ टाऊनशीप, एम बी इस्टेट, बोलींज परिसर, आगाशी परिसर, नायगाव पूर्व स्टार सिटी हे हॉटस्पॉट म्हणून घोषित झाले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई विरार महापालिका प्रचंड मेहनत घेत आहे. महापालिकेचे आरोग्य कर्मचारी प्रत्येक घराघरात जाऊन सर्वेक्षण करत आहेत. खोकला, सर्दी, ताप असे लक्षणे आढळलेल्या नागरिकांची माहिती घेत आहे. संशयितांना क्वारंटाईन केलं जात असून त्यांची तपासणी केली जात आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 33 हजारांच्या पार
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 33 हजारांच्या पार पोहोचला आहे. राज्यात काल (17 मे) सर्वाधिक 2 हजार 347 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 33 हजार 053 वर पोहोचली आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत आज 1 हजार 595 रुग्णांची नोंद करण्यात आली. तर राज्यात आज 2, 347 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 33 हजार 053 पर्यंत पोहोचला आहे. तर मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजार 150 वर पोहोचला आहे.
संबंधित बातम्या :
Pune RTO | पुणे जिल्ह्यात सोमवारपासून आरटीओ सुरु, कंटेनमेंट झोनमधील नवीन गाड्यांची नोंदणी होणार नाही