वसई विरारमध्ये दिवसभरात 5 रुग्णांची कोरोनावर मात, 130 पैकी 46 रुग्ण बरे

कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असला तरी या आजारातून (Vasai Virar Corona Update) बाहेर पडणाऱ्यांची संख्यादेखील आता हळूहळू वाढू लागली आहे. वसई विरारमध्ये आज दिवसभरात 5 रुग्णांनी कोरोनार यशस्वी मात केली आहे.

वसई विरारमध्ये दिवसभरात 5 रुग्णांची कोरोनावर मात, 130 पैकी 46 रुग्ण बरे
Follow us
| Updated on: Apr 29, 2020 | 7:35 PM

पालघर : कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असला तरी या आजारातून (Vasai Virar Corona Update) बाहेर पडणाऱ्यांची संख्यादेखील आता हळूहळू वाढू लागली आहे. वसई विरारमध्ये आज दिवसभरात 5 रुग्णांनी कोरोनार यशस्वी मात केली आहे. त्यामुळे या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वसई विरार भागात कोरोना रुग्णांची संख्या आतापर्यंत 130 वर पोहोचली आहे. या 130 रुग्णांपैकी 46 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे (Vasai Virar Corona Update).

वसई विरार शहरात आज दिवसभरात डिस्चार्ज दिलेल्या 5 रुग्णांमध्ये 2 पुरुष तर 3 महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात विरार पश्चिमेकडील 57 वर्षीय पोलीस कॉस्टेबलदेखील आहेत. याशिवाय वसई पश्चिमेकडील 67 वर्षीय वृद्ध व्यक्तीने कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, तीन महिलांपैकी एक महिला वसईची तर दोन महिला नालासोपारा शहरातील आहेत.

दरम्यान, वसई विरार शहरात एकीकडे कोरोनाचे रुग्ण बरे होत असताना आज पुन्हा एकदा नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. विशेष म्हणजे हा रुग्ण तरुण आहे. हा 27 वर्षीय रुग्ण मुंबईतील एका रुग्णालयात एक्सरे टेक्निशिअन म्हणून काम करतो. या रुग्णाचा रिपोर्ट आज कोरोना पॉझिटिव्ह आला. या रुग्णाला विरार पश्चिमेकडील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या नव्या रुग्णामुळे वसईतील कोरोना रुग्णांची संख्या 130 वर पोहोचली आहे. यातील 8 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

वसई, विरार, नालासोपारा क्षेत्रात 31 हॉटस्पॉट झोन झाले असून 30 वार्डात हे विभागलेले आहेत. यामध्ये वसई पश्चिम, वसई गाव, नालासोपारा पूर्व, विरार पश्चिम भागात कोरोना रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे. वसई पश्चिम आनंद नगर, साई नगर, ओम नगर, विना नगर, वसई गाव पापडी, गास, वसई पूर्व एव्हरशाईन, एव्हरशाईन सेक्टर 06, वसंत नगरी, नालासोपारा पूर्व आचोले, तुलिंज, भारत पेंढारी नगर (डॉन लेन), बु-हान नगर, सेन्ट्रलपार्क, प्रगती नगर, रहमत नगर, धणीवबाग, नालासोपारा पश्चिम निलेमोरे गाव, विरार पूर्व जगन्नाथ नगर, फुलपाडा, नारंगी गणपती मंदिर परिसर, विरार पश्चिम गोकुळ टाऊनशीप, एम बी इस्टेट, बोलींज परिसर, आगाशी परिसर, नायगाव पूर्व स्टार सिटी हे हॉटस्पॉट म्हणून घोषित झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई विरार महापालिका प्रचंड मेहनत घेत आहे. महापालिकेचे आरोग्य कर्मचारी प्रत्येक घराघरात जाऊन सर्वेक्षण करत आहेत. खोकला, सर्दी, ताप असे लक्षणे आढळलेल्या नागरिकांची माहिती घेत आहे. संशयितांना क्वारंटाईन केलं जात असून त्यांची तपासणी केली जात आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. राज्यात काल (28 एप्रिल) दिवसभरात तब्बल 729 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 9 हजार 318 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजारांवर गेली आहे तर पुण्यातील रुग्णांची संख्या 1100 पेक्षाही जास्त झाली आहे.

संबंधित बातम्या :

दाटीवाटीच्या मालेगावात होम क्वारंटाईन अशक्य, संस्थात्मक क्वारंटाईन करणार : आरोग्य मंत्री

पुण्यात चिकनसाठी गर्दी, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पायदळी

राज्यातील शाळांची फी वाढ थांबवा, आशिष शेलारांचं शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.