Photos | प्रकाश आंबेडकर मंदिर प्रवेशावर ठाम, पंढरपुरात कडेकोट पोलीस बंदोबस्त
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर पंढरपूरमध्ये मंदिर प्रवेशावर ठाम आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे.

- वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील मंदिरं खुली करावी, अशी मागणी करत पंढरपूरमध्ये आंदोलनाची घोषणा केली.
- आमच्या आंदोलनानंतर राज्यातील सर्व मंदिर खुली होतील. यापुढे मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय.
- मी सरकारला मंदिरं खुली करण्यासाठी पटवून सांगणार आहे, असंही आंबेडकर यांनी म्हटलंय.
- या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
- मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी पोलीस बंदोबस्त असला तरी आम्ही आमचं आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
- विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनासाठी वंचितचे अनेक कार्यकर्ते पंढरपुरात दाखल झाले. यानंतर पोलिसांनी त्यांना पंढरपूरमधील शिवाजी चौकात रोखले.
- पंढरपुरात जवळपास आठशे ते एक हजार कार्यकर्ते दाखल झाले आहेत.
- प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मोजक्या कार्यकर्त्यांना नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी पोलिसांनी तयारी दाखवली आहे.
- प्रकाश आंबेडकर पोलिसांची विनंती कितपत आणि कशी मान्य करतात यावरच आंदोलनाची दिशा स्पष्ट होणार आहे.
- प्रकाश आंबेडकरांच्या या आंदोलनाला अनेक वारकरी संघटनांचा पाठिंबा आहे. मात्र आंदोलनात सहभागी वारकऱ्यांची संख्या अत्यल्प दिसून आली.
Pandharpur Temple reopening strike by Prakash Ambedkar