थलपती विजयच्या चाहत्यांसाठी खूशखबर, ‘मास्टर’चा जलवा चित्रपटगृहांमध्येच, तारीख ठरली
तामिळ चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार विजयच्या ‘मास्टर’ (Master) या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे विजयचे चाहते डोळे लावून बसले आहेत.
चेन्नई : तामिळ चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार विजयच्या ‘मास्टर’ (Master) या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे विजयचे चाहते डोळे लावून बसले आहेत. त्यातच विजयचं (Thalapathy Vijay) फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत चाललंय. गेल्या काही काळात विजयने केलेले सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. विजयचा बहुप्रतीक्षित मास्टर या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे त्याचे चाहते डोळे लावून बसले आहेत. (Vijay’s Master to release on 13 january 2021 in theatres)
‘मास्टर’ हा चित्रपट 13 जानेवारी 2021 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाचं एक पोस्टर शेअर करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. एक्सबी फिल्म क्रिएटर्सने पोस्टर शेयर करत सांगितले आहे की, हा चित्रपट तमिळ, तेलुगू, आणि हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित केला जाईल. विजयचे चाहते गेल्या वर्षभरापासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहात आहेत.
‘मास्टर’ या चित्रपटात थलपती विजयसोबत अभिनेता विजय सेतूपती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ‘मास्टर’ हा चित्रपट दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबतची अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली नव्हती, गेल्या काही महिन्यांपासून चर्च होती की, हा चित्रपट 2021 मध्ये पोंगल या सणाच्या दिवशी प्रदर्शित केला जाऊ शकतो.
Aana aavanna apna time na Vanganna vanakkamna
Ini #VaathiRaid na! ?#Vaathicoming to theatres near you on January 13. #Master #மாஸ்டர்#మాస్టర్#VijayTheMaster #MasterPongal #MasterOnJan13th pic.twitter.com/RfBqIhT95U
— XB Film Creators (@XBFilmCreators) December 29, 2020
या चित्रपटात थलपती विजय हा एका प्राध्यापकाच्या भूमिकेत दिसणार आहे तर विजय सेतूपती खलनायकाची भूमिका बजावणार आहे. या दोघांसह या चित्रपटात मालविका मोहनन, अर्जुन दास, राम्या महत्त्वाच्या भूमिका निभावणार आहेत. हा चित्रपट सुरुवातीला एप्रिल 2020 मध्ये प्रदर्शित केला जाणार होता. परंतु कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे चित्रपट त्यावेळी प्रदर्शित करता आला नाही.
‘मास्टर’ ठरला ट्विटरवरील सर्वात फेव्हरेट चित्रपट
दोन आठवड्यांपूर्वी ट्विटरने जारी केलेल्या रिपोर्ट्सनुसार विजयचा अपकमिंग चित्रपट ‘मास्टर’बाबत 2020 या वर्षात सर्वाधिक ट्विट करण्यात आले आहेत. प्रदर्शनापूर्वीच ‘मास्टर’ ट्विटरवर हिट ठरला आहे. विजयच्या ‘मास्टर’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून दोन्ही विजयच्या (विजय सेतूपती आणि थलापती विजय) चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत कमालीची उत्सूकता आहे. चित्रपटाच्या घोषणेपासून #master हा हॅशटॅग अनेकदा ट्विटरवर ट्रेंड झाला आहे. चित्रपटाबाबतची प्रत्येक अपडेट मिळाल्यानंतर #master हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत होता.
— Twitter India (@TwitterIndia) December 14, 2020
‘मास्टर’ या चित्रपटाने ट्विटरच्या ट्रेंड लिस्टमध्ये सर्वात वरचं स्थान पटकावलं आहे. विजयच्याच ‘सरकार’ आणि ‘बिगिल’ या दोन चित्रपटांच्या नावांचे हॅशटॅग्स 2018 आणि 2019 मध्ये ट्विटरच्या टॉप ट्रेंडिग यादीत पहिल्या स्थानावर होते. तर या यादीवर यंदाही विजयनेच वर्चस्व गाजवलं आहे. यंदा #master हा हॅशटॅग ट्विटरच्या ट्रेंड लिस्टमध्ये टॉपला आहे.
‘मास्टर’चा जलवा चित्रपटगृहांमध्येच
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशी अफवा पसरली होती की ‘मास्टर’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित न होता थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. परंतु या सर्व अफवांचे चित्रपटाच्या निर्मात्यांनी खंडण केले होते. तसेच त्यांनी सांगितले होते की हा चित्रपट चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित होईल. तसेच लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करु. त्याप्रमाणि निर्मात्यांनी आज चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार हा चित्रपट 13 जानेवारी 2021 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
इतर बातम्या
Thalaivi : ‘थलायवी’चं शूटिंग पूर्ण, जयललीता यांचा फोटो शेअर करत कंगनाचं भावनिक ट्विट
Birthday Special : दिवसाला 40 अंडी आणि 8 तास व्यायाम, भल्लालदेवच्या भूमिकेसाठी राणाची खास मेहनत
Rajinikanth B’day Special : एवढ्या गोष्टी करा आणि सुपरस्टार रजनीएवढं फिट व्हा!
(Vijay’s Master to release on 13 january 2021 in theatres)