शेतकऱ्यांचा अपमान करणारे दानवे येडपट, भैताड; वडेट्टीवारांचा तोल सुटला

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा तोल सुटला. (vijay wadettiwar slams raosaheb danve over farmer remarks)

शेतकऱ्यांचा अपमान करणारे दानवे येडपट, भैताड; वडेट्टीवारांचा तोल सुटला
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 12:17 PM

नागपूर: भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा तोल सुटला. शेतकऱ्यांचा अवमान करणारे रावसाहेब दानवे हे येडपट आणि भैताड आहेत, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. (vijay wadettiwar slams raosaheb danve over farmer remarks)

‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी ही टीका केली. शेतकऱ्यांचा अपमान करणारे रावसाहेब दानवे येडपट आणि भैताड आहेत. हे भैताड राजकारणात कसं आलं माहीत नाही. कार्टुन जसे वागतात तसेच हे वागत आहेत, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी दानवेंवर केली. बच्चू कडू यांनी सांगितल्याप्रमाणे दानवेंच्या कमरेत डावा किंवा उजवा घातला पाहिजे. त्यांच्या कमरेत हाणायला पाहिजे, असं धक्कादायक विधानही त्यांनी केलं.

मग चर्चा तरी कशाला करता?

शेतकऱ्यांचा अनादर करणाऱ्या व्यक्तीला भाजपमध्ये मंत्री केलं जातं. त्यामुळे भाजपची किव येते. भाजपला काहीस कसं वाटत नाही. त्यांना लाज वाटत नाही का? असा सवाल करतानाच केंद्रीय गृहमंत्री शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत. मग शेतकरी जर पाक आणि चीनचे असतील तर त्यांच्याशी चर्चा तरी कशाला करता? असा सवालही त्यांनी केला. (vijay wadettiwar slams raosaheb danve over farmer remarks)

दानवे काय म्हणाले होते?

राजधानी दिल्लीत पंजाब, हरियाणातील शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. देशातील इतर राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. एकीकडे हे आंदोलन तीव्र होत असतानाच दुसरीकडे भाजपचे नेते या आंदोलनावर टीका करताना दिसत आहे. रावसाहेब दानवे यांनी तर या आंदोलनाचा संबंध थेट चीन व पाकिस्तानशी जोडून नवा वाद ओढवून घेतला आहे.

‘हे शेतकऱ्यांचं आंदोलन नसून या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. पहिल्यांदाच देशातील मुस्लिम समाजाला भरकटवलं आणि सीएए आणि एनसीआरमुळं मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल, असं सांगितलं. पण एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?’ असा सवाल दानवेंनी यावेळा केला होता. त्यावर गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी टीका केली होती. रावसाहेब दानवे हे एक ज्येष्ठ राजकीय नेते आहेत, त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करणं चुकीचे आहे. शेतकऱ्यांबद्दल सर्व देशभरात सहानुभूतीचे वातावरण आहे, असे असताना दानवे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य कोणत्या पुराव्याच्या आधारे केलं हे त्यांनी स्पष्ट करावं. जर त्यांच्याकडे असे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांना द्यावेत आणि स्वतःच्या वक्तव्यावर ठाम राहावं, असं पाटील म्हणाले होते. (vijay wadettiwar slams raosaheb danve over farmer remarks)

संबंधित बातम्या:

दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा, चेक करावा लागेल; बच्चू कडू यांची घणाघाती टीका

सुपारीबाज आंदोलकांना मोदी भीक घालणार नाहीत; तुमची दमबाजी मोडूनच काढायला हवी : अतुल भातखळकर

“मतदारांनी भाजपला जागा दाखवली, कुठलीही पालिका निवडणूक लढवा, पराभव निश्चित”

(vijay wadettiwar slams raosaheb danve over farmer remarks)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.