Viral Inspire Story : मुलगा होताच नवऱ्याने सोडलं, 14 वर्षे संघर्ष करत गाठलं यशशिखर
पतीने सोडले तेव्हा अॅनी कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाला होती. परीक्षा दोन महिन्यांवर आली होती. त्यामुळे तातडीने निवाऱ्याची गरज होती. त्याकाळात आजीने तिच्याकडे आसरा दिला.
तिरुवअनंतपुरम् : Viral Inspire Story जिद्द, संघर्ष आणि मेहनतीची तयारी असली तर कोणतेही लक्ष गाठता येते. अनेक संघर्षाच्या कथा आपण वाचत असतो. केरळमधील अॅनीची काहणी त्यापेक्षा वेगळी आहे. अॅनीने (annie shiva)तब्बल १४ वर्षांचा संघर्ष आहे. कॉलेजला असतानाच अॅनी प्रेमात पडली, पण लग्नानंतर दोनच वर्षांत नवऱ्याने सोडले. प्रेमविवाहामुळे घरच्या मंडळींनी स्वीकारण्यास नकार दिला. मग आठ महिन्याचा मुलासह दारोदारी भटकली…आसरा शोधू लागली…पण संघर्ष करता करता यश गाठले.
चौदा वर्षांपूर्वी अॅनी शिवाने वयाच्या १८ व्या वर्षी घरच्या मंडळींच्या विरोधात जाऊन शिवाशी लग्न केले. त्यावेळी ती कांजीरामकुलम येथील केएनएम गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रथम वर्षाची समाजशास्त्राचे शिक्षण घेत होती. शिक्षण सुरु असताना मुलगा झाला. परंतु मुलगा आठ महिन्यांचा असताना पतीने दोघांना सोडले. शिक्षण अपुर्ण, पतीने सोडले, माहेरच्या मंडळींनी नाकारले असे आव्हानांचे डोंगर अॅनीसमोर होते. परंतु या सर्व अडचणी आणि अडथळ्यांवर मात करत अॅनी वर्कला पोलिस स्टेशनमध्ये उपनिरीक्षक म्हणून काम करते.तिची कहाणी देशभरातील शेकडो महिलांसाठी प्रेरणा देणारी आहे.
आधी केले शिक्षण पुर्ण :पतीने सोडले तेव्हा अॅनी कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाला होती. परीक्षा दोन महिन्यांवर आली होती. त्यामुळे तातडीने निवाऱ्याची गरज होती. त्याकाळात आजीने तिच्याकडे आसरा दिला. मग अभ्यास सांभाळत घरोघरी करी पावडर आणि इतर वस्तू घरोघरी विकून उदरनिर्वाह केला. विमा एजंटचे काम केले. त्या दरम्यान स्वतःसाठी आणि तिच्या मुलासाठी स्वतंत्र भाड्याची जागा शोधली आणि काही महिन्यांत भाड्याच्या घरात गेली. अॅनी म्हणते, संघर्षाच्या दिवसांत अनेक वेळा एकावेळीच जेवण केले. मुलाला भुकेने रडताना पाहून आईच्या हृदयला खूप वेदना होत होत्या. तान्हुल्या मुलाला उपाशी झोपवावे लागत होते.
IPS ऐवजी PSI केली तयारी :अॅनीने IPS व्हावे, असे तिच्या वडिलांना नेहमी वाटायचे. तिला नातेवाईकांकडून IPS परीक्षेची माहिती मिळाली. मग एका महिन्याचा क्रॅश कोर्स घेतला. त्यासाठी दिवसभरातून २० तास अभ्यास करु लागली. परीक्षेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी काम सोडले. २०१६ मध्ये कॉस्टेबल म्हणून नियुक्ती मिळाली. आयपीएसमध्ये यश मिळाले नसल्याने पीएसआयच्या तयारीसाठी प्रयत्न सुरु केले. परंतु पीएसआयचे स्वप्न लांब होते. केरळमध्ये एकही महिला पीएसआय नव्हती.अखेरीस २५ जून २०२१ रोजी वर्कला पोलिस स्टेशनमध्ये उपनिरीक्षक म्हणून नियुक्त झाले.अॅनी आज हजारो महिलांसाठी प्रेरणादायी बनली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशोशिखर गाठले.