वरुण धवन-कोहलीसह Money Heist च्या प्रोफेसरचा फोटो, मुंबई पोलिसांच्या ट्वीटमागे कारण काय?

मुंबई पोलीस आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून जनजागृतीसह नागरिकांना मजेशीररित्या सूचना देण्याचा प्रयत्न करत असतात. अशीच एक पोस्ट सध्या कमालीची व्हायरल होत आहे.

वरुण धवन-कोहलीसह Money Heist च्या प्रोफेसरचा फोटो, मुंबई पोलिसांच्या ट्वीटमागे कारण काय?
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 5:03 PM

मुंबई : आपल्या धडाकेबाज कामासोबतच जनजागृतीसाठी सोशल मीडिया पोस्ट तयार करण्यात मुंबई पोलिसांचा (Mumbai Police) कोणी हात धरु शकत नाही. विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यासाठी किंवा नागरिकांना सूचना करण्यासाठी मुंबई पोलीस करत असलेल्या सोशल मीडिया पोस्ट कायम व्हायरल होतात. अशीच एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि प्रसिद्ध स्पॅनिश वेब सिरीज मनी हायस्टमध्ये प्रोफेसरचे (Money Heist Professor) पात्र साकारणारा अभिनेता एल्वारो मोराते (Álvaro Morte) यांचा फोटो आहे. ‘प्रत्येक वेगळ्या सोशल मीडिया किंवा ऑनलाईन खात्यासाठी वेगळा पासवर्ड वापरा’ हा संदेश पोहचवण्यासाठी मुंबई पोलिसांनी ही शक्कल लढवली आहे. (Virat Kohli Varun Dhawan Money Heists Professor in Mumbai Police Post )

ट्विटचा नेमका अर्थ काय?

मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या फोटोत असणारे विराट, वरुण आणि एल्वारो या तिघांची हेअरस्टाईल एकमेंकासारखीच दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्यात बरेच साम्य दिसून येत आहे. असेच साम्य अनेकांच्या वेगवेगळ्या ऑनलाईन खात्यांच्या पासवर्डमध्ये आढळून येते. सर्व खात्यांचे पासवर्ड सारखे असल्यास अकाऊंट हॅक होण्याची भीती अधिक असते. त्यामुळे याबाबत जागृती करण्यासाठी ‘तुम्ही या तिघांच्या हेअरस्टाईलप्रमाणे जसेच्या-तसे पासवर्ड ठेवू नका’ असं या पोस्टमधून मुंबई पोलिस सांगू इच्छितात. या पोस्टच्या खाली पोलिसांनी ‘वेगवेगळ्या ऑनलाईन खात्यांचे पासवर्ड कसे ठेऊ नये, याचे उदाहरण’ अशी मराठीत कंमेट करत ट्विटचा अर्थ देखील समजावला आहे.

संबंधित बातम्या : 

मुंबई पोलिसांच्या या ट्विटवरून तुम्हाला काय समजलं? नशा करू नका सांगण्यासाठी भन्नाट Tweet

सागर राणा हत्या प्रकरणात बेड्या, मग रेल्वेने नोकरीतून हाकललं, आता सुशील कुमारला आणखी एक झटका

‘ये रिश्ता क्या…’ फेम अभिनेता करण मेहराला रात्रभर खावी लागली तुरुंगाची हवा, पत्नीने दाखल केली होती तक्रार!

(Virat Kohli Varun Dhawan Money Heists Professor in Mumbai Police Post )

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.