WTC Final मधील पराभवानंतर सेहवागने पोस्ट केलं भन्नाट Meme, प्रसिद्ध वेब सिरीज मिर्झापुरमधील ‘तो’ डायलॉग केला शेअर

अथक प्रयत्न आणि दोन वर्षांच्या मेहनतीनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचलेला भारतीय संघ न्यूझीलंडकडून 8 विकेट्सने पराभूत झाला. या पराभवांमुळे भारतीय क्रिकेट रसिकांचा मोठा हिरमोड झाला. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने देखील आपली निराशा एक Meme शेअर करत व्यक्त केली आहे.

WTC Final मधील पराभवानंतर सेहवागने पोस्ट केलं भन्नाट Meme, प्रसिद्ध वेब सिरीज मिर्झापुरमधील 'तो' डायलॉग केला शेअर
वीरेंद्र सेहवाग
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 6:03 PM

मुंबई : भारताचा सर्वात स्फोटक फलंदाज म्हणून प्रसिद्ध असणारा वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) मागील काही वर्षांपासून सोशल मीडियावरही तुफान फटकेबाजी करतो आहे. कधी ट्विट तर कधी एखाद्या ट्वीटला रिप्लायदेत वीरेंद्र सेहवाग त्याचा सेन्स ऑफ ह्युमर किती भारी आहे हे दाखवून देतो. दरम्यान भारत न्यूझीलंडकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतरही निराश वीरुने खेळाडू वृत्तीने एक मजेशीर Meme शेअर करत भारतीय क्रिकेटपटूंना कोपरखळी दिली आहे. हे मीम म्हणजे प्रसिद्ध वेब सिरीज मिर्झापुरमधील एक डायलॉग आहे. (Virendra Sehwag Shares Mirzapur meme after India Lost WTC Final Against New Zealand)

न्यूझीलंडला दिल्या शुभेच्छा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना संपल्यानंतर सेहवागने न्यूझीलंड संघाला शुभेच्छा दिल्या होत्या. न्यूझीलंडने दोन वर्षांपूर्वी थोडक्यात 50 ओव्हरचा विश्वचषक गमावला होता. पण त्यानंतर सर्वांत पहिले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचा मान न्यूझीलंडने मिळवला यासाठी तुमचे अभिनंदन. तुम्ही या विजयास पात्र आहात. असं ट्विट सेहवागने शेअर केलं होतं.

हे ही वाचा :

“विराट कोहलीला कर्णधारपदावरुन हटवणं क्रिकेटमधील अपराध ठरेल”

WTC Final मध्ये का पराभूत झाला भारतीय संघ?, सचिन तेंडुलकरने सांगितलं कुठे चूकला विराट कोहली

WTC स्पर्धेत अश्विनचा डंका, सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड, कांगारु बोलरला पछाडलं!

(Virendra Sehwag Shares Mirzapur meme after India Lost WTC Final Against New Zealand)

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.