Breaking | रिफायनरी ठरावाला समर्थन केल्यानं नगरसेविका प्रतीक्षा खडपेंवर कारवाई
राजापूर नगरपरिषदेतील शिवसेना नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. रत्नागिरी रिफायनरीच्या समर्थनाच्या ठरावाच्या बाजूने मतदान केल्यानं ही कारवाई करण्यात आली. shivsena removed corporator pratiksha Khadpe from the party

रिफायनरी ठरावाला समर्थन केल्यानं नगरसेविका प्रतीक्षा खडपेंवर कारवाई
राजापूर नगरपरिषदेतील शिवसेना नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. रत्नागिरी रिफायनरीच्या समर्थनाच्या ठरावाच्या बाजूने मतदान केल्यानं ही कारवाई करण्यात आली. राजापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी नगरसेविका प्रतिक्षा खडपे यांच्यावर ही कारवाई केलीय.
मंगळवारी राजापूर नगरपरिषदेने रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचा ठराव मांडला. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि सेनेच्या दोन नगरसेविकांनी समर्थन देत हा ठराव मंजूर केला. शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिक्षा खडपे यांना या ठरावाला पाठिंबा देत मतदान केलं. त्यामुळे प्रतिक्षा खडपे यांची पक्षातून हक्कालपट्टी करण्यात आलीय.