मुंबई ते वर्धा पायपीट, गावी परतलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई ते वर्धा अशी पायपीट करुन रोहणा येथे (Wardha Corona Update) दाखल झालेल्या 25 वर्षीय तरुणाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
वर्धा : मुंबई ते वर्धा अशी पायपीट करुन रोहणा येथे (Wardha Corona Update) दाखल झालेल्या 25 वर्षीय तरुणाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. हा तरुण 20 मे रोजी सकाळी वर्ध्याच्या रोहणा येथे पोहोचला. रोहणा येथे पोहोचताच त्याने थेट प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले (Wardha Corona Update).
संबंधित तरुणामध्ये कोरोनाची लक्षण आढळत असल्याने त्याला तातडीने रुग्णवाहिकेने आर्वी येथील आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याची 21 मे रोजी कोरोना चाचणी केली गेली. या चाचणीचा अहवाल आज (23 मे) समोर आला. या अहवालात तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
हा तरुण मुंबईच्या अंधेरी येथे वास्तव्यास होता. तिथे तो एका क्लिनिंग सेंटरवर हाऊस किपिंगचं काम करायचा. मात्र, लॉकडाऊनदरम्यान काम बंद पडल्याने त्याने मुळगावी परतण्याचा निर्णय घेतला. हा तरुण पायपीट करुन 20 मे रोजी वर्ध्यात दाखल झाला.
हा तरुण मुंबईहून पायी निघाला होता. दरम्यान वाटेत त्याने अनेक वाहनांद्वारे टप्प्याटप्प्याने प्रवास केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे तो किती लोकांच्या संपर्कात आला, याचा तपास प्रशासनाकडून घेतला जात आहे.
वर्ध्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 12 वर पोहोचला आहे. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर इतर 11 रुग्ण हे मुंबई, वाशिम, अमरावती या भागातून आलेले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. लॉकडाऊनदरम्यान अनेक उद्योगधंदे बंद पडले. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन कारावा लागला. त्यामुळे अनेकांनी आपल्या मुळगावी जाण्याचा निर्णय घेतला. हजारो नागरिक पायी, मिळेल त्या वाहनाने आपल्या मुळगावाकडे निघाले.
संबंधित बातम्या :
पुण्यात डॉक्टरचा ‘कोरोना’मुळे मृत्यू
कोरोनाबाधित महिलेला पाच दिवसात डिस्चार्ज, पुण्यातील नामांकित खासगी रुग्णालयाचा धक्कादायक प्रकार
Corona | देशात कोरोनाबाधितांची रेकॉर्डब्रेक वाढ, 24 तासात 6 हजारांहून अधिक नवे रुग्ण