पुढील दोन दिवस पुणे, कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, विदर्भ-मराठवाड्यात हलक्या सरी

पुढील दोन दिवस कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसेल, अशा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुढील दोन दिवस पुणे, कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, विदर्भ-मराठवाड्यात हलक्या सरी
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 6:43 PM

पुणे : पुढील दोन दिवस कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसेल, अशा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच यंदा ऑक्टोबरपर्यंत लांबलेल्या पावसाचा जोर 12 ऑक्टोबरनंतर कमी होईल, असेही वेधशाळेने म्हटले आहे. मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाच्या सरी बरसतील, असे सांगण्यात आले आहे. (Warning of heavy rains in Konkan, Goa and Central Maharashtra for next two days, light showers in Vidarbha-Marathwada)

दरम्यान, मुसळधार पावासाने पुणे शहराला पुन्हा एकदा झोपडून काढले आहे. पुण्याच्या पूर्व भागात काल तीन तासांपेक्षा जास्त वेळ पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे चाकरमानी तसेच नागरिकांची मोठी फजिती झाली. धानोरी येथे सखल भागात पाणी साचले तर वाकडेवाडी, ताडीवाला रोड येथे वृक्ष उन्मळून पडल्याची घडली.

उत्तर महाराष्ट्रात आज जबर पावसाची शक्यता

उत्तर महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात आज रविवारी जबर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू असून, त्यामुळे पिकांवर अक्षरशः नांगर फिरल्यागत जमा आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू आहे. त्यामुळे द्राक्षबागा, कांदा, सोयाबीनचा चिखल झाला आहे. त्यातच सध्या वायव्य भारतात मान्सूनच्या परतीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार 10 ऑक्टोबर रोजी उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे शाहीन वादळाचा रविवारी (10 ऑक्टोबर) उत्तर महाराष्ट्राला जबर तडाखा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात परतीच्या पावसाचे 16 ते 18 ऑक्टोबर आणि राजस्थानमध्ये 13 ते 14 ऑक्टोबर दरम्यान आगमन होण्याची शक्यता आहे. मात्र, मध्य व दक्षिण भारतात मान्सून आणखी काही दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुन्हा 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 25 ऑक्टोबर नंतर पावसाळी वातावरण हटण्याचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्याकडे यंदा सुरुवातीच्या काळात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे धरणे तळाला गेली. शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले. मात्र, सप्टेंबर महिन्यात लावलेल्या जोरदार हजेरीने त्याने सारी कसर भरून काढली. मनमाड, नांदगाव परिसरात दोन दोनदा ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली. यंदा नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आला. या पावसाने जिल्ह्यातील गंगापूर धरण समूह भरला आहे.

धानोरी येथील संकल्प नगरीच्या सखल भागात पाणी

पुण्यात चार दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला होता. या पावसामुळे रस्ते, नाले तुडूंब भरले होते. आज पुन्हा एकदा शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पवासामुळे धानोरी येथील संकल्प नगरीच्या सखल भागात पाणी साचले. मुसळधार पावसामुळे येथे इमारतीच्या पार्किंपर्यंत पाणी आले. ढगांच्या गडगडाटासह आज पुण्यात पाऊस बरसला.

ठिकठिकाणी पाणी साचले, चार ठिकाणी झाडे उम्नळून पडली

पुणे शहरात पावसामुळे बरसल्यामुळे येरवडा, टिंगरेनगर, धानोरी, नागपूर चाळ, मुंजोबा वस्ती, म.हौ. बोर्ड येथे पाणी साचले. तर वाकडेवाडी, ताडीवाला रोड, वाडिया कॉलेज, येरवडा येथे वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या. तसेच पिसोळी ग्रामपंचायतजवळ वीज पडून आग लागल्याचा प्रकार समोर आला. घटनास्थळी घराबाहेरील मीटर बॉक्सने पेट घेतला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने दाखल होत आग विझवली. घराशेजारील इलेक्ट्रिक पोलवर वीज कोसळून पुढे लगेचच मीटर बॉक्सने पेट घेतला.

नालासोपाऱ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस

पुण्यासोबतच महाराष्ट्रातील इतर काही जिल्ह्यात पावसाची नोंद झाली. वसई विरार नालासोपाऱ्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या भागात संध्याकाळी आकाश पूर्णपणे भरून आले होते. त्यानंतर विजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पावसाने हजेरी लावली. तसेच राज्यात पुढचे 3 ते 4 दिवसात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

(Warning of heavy rains in Konkan, Goa and Central Maharashtra for next two days, light showers in Vidarbha-Marathwada)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.