गॉगल लावून आला आणि झिरोवर आऊट झाला, क्रिकेट चाहत्यांनी अय्यरला केलं ट्रोल

श्रेयस अय्यर दुलीप ट्रॉफी सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर सनग्लासेस घातल्याबद्दल चाहत्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केले. एक्सवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत त्याच्या या निर्णयावर त्याला चांगलेच ट्रोल केले आहे.

गॉगल लावून आला आणि झिरोवर आऊट झाला, क्रिकेट चाहत्यांनी अय्यरला केलं ट्रोल
Follow us
| Updated on: Sep 14, 2024 | 2:04 AM

भारतीय संघाचा खेळाडू श्रेयस अय्यरची खराब कामगिरी सुरुच आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये भारत-डी संघाचा कर्णधार शून्यावर बाद झालाय. भारत-अ संघाचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने श्रेयस अय्यरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. श्रेयस अय्यरला केवळ सात चेंडूंचा सामना करता आला. सामन्यादरम्यान श्रेयस अय्यर सनग्लासेस लावून खेळायला गेला होता. या सामन्यात भारत अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 290 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना सुरुवातीच्या धक्क्यांमुळे इंडिया-डीचा डाव बॅकफूटवर आला. अथर्व तायडे 4 धावा करून लवकर बाद झाला. यश दुबे अवघ्या 14 धावा करून बाद झाला.  संघाला कर्णधार श्रेयस अय्यरकडून मोठ्या अपेक्षा होत्या. हा सामना अय्यरसाठी खूपच महत्त्वाचा होता.

चष्मा घालून फलंदाजीला आला

श्रेयस अय्यर या सामन्यात हेल्मेटमध्ये गडद चष्मा घालून फलंदाजीला आला होता. मात्र, त्याला आपल्या डावात केवळ 7 चेंडूंचा सामना करता आला आणि तो खाते न उघडता खलील अहमदचा बळी ठरला. अय्यर खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. आता सोशल मीडियावर त्यांच्यावर बरीच टीका होत आहे.

श्रेयस अय्यरचा खराब फॉर्म सुरूच आहे. दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत त्याला केवळ 63 धावा करता आल्या. या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांतून श्रेयसला वगळण्यात आले होते. नंतर बीसीसीआयनेही त्याला केंद्रीय करारातून काढून टाकले. बांगलादेश मालिकेसाठी नुकत्याच जाहीर झालेल्या संघात श्रेयस अय्यरचाही समावेश करण्यात आलेला नाही.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.