Wedding Bells : वेडिंग बेल्स, कनिका ढिल्लो आणि हिमांशु शर्मा लग्न बंधनात
कनिका ढिल्लो आणि हिमांशु शर्मा यांनीही नव्या वर्षात लग्न गाठ बांधली आहे. (Wedding Bells, Kanika Dhillon and Himanshu Sharma tied the knot)

मुंबई : हे नवं वर्ष अनेकांच्या आयुष्यात आनंद घेऊन आलं आहे. बॉलिवूड चित्रपट लेखक कनिका ढिल्लो आणि हिमांशु शर्मा यांनीही नव्या वर्षात लग्न गाठ बांधली आहे. या दोघांचा लग्न सोहळा अतिशय साध्या पद्धतीनं पार पडला, लग्नाला केवळ कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्र उपस्थित होते. आता कनिकानं लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन ही बातमी चाहत्यांना दिली आहे. लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सेलिब्रिटींनीही या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘हिमांशु शर्मासोबत 2021ची नवीन सुरुवात….’ असं कॅप्शन देत कनिकानं फोटो शेअर केले आहेत. काही फोटोंमध्ये कनिका आणि हिमांशु विधी करताना दिसत आहेत. कनिकानं लग्नात गुलाबी आणि गोल्डन कलरचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी कनिकानं तिच्या साखरपुड्याचे फोटोसुद्धा शेअर केले होते. तसेच लवकरच ती लग्न करणार असल्याचंही तिनं सांगितलं होतं. त्यावेळी हिमांसुनं सुद्धा आता आपण लग्न करत असल्याचं सांगितलं होतं.
View this post on Instagram
हिमांशु शर्मा आणि स्वरा भास्कर बर्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सुद्धा होते. मात्र काही काळानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. तसेच गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कनिका ढिल्लन आणि चित्रपट निर्माते प्रकाश कोवलामुदी यांचा घटस्फोट झाला.
हिमांशुला राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. त्यानं ‘तनु वेड्स मन्नु’, ‘रांझणा’ यासारखे चित्रपट लिहिले आहेत. त्याचबरोबर कनिकानं ‘केदारनाथ’, ‘मनमर्जियान’, ‘जजमेंटल है क्या’ यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट लिहिले आहेत.